सोमनाथ पतसंस्थेने सभासदांचा विकास साधला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:05 AM2021-02-20T05:05:42+5:302021-02-20T05:05:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खोची : सभासदांच्या अर्थकारणाला बळकटी देत सर्वोच्च विकास साधण्यासाठी सोमनाथ पतसंस्थेने घेतलेली भूमिका प्रशंसनीय आहे. लवकरच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खोची : सभासदांच्या अर्थकारणाला बळकटी देत सर्वोच्च विकास साधण्यासाठी सोमनाथ पतसंस्थेने घेतलेली भूमिका प्रशंसनीय आहे. लवकरच संस्थेचा जिल्हाभर विस्तार होऊन ही संस्था आर्थिक क्षेत्रातील नामवंत संस्था म्हणून नावारूपास येईल, असे गौरवोद्गार जिल्हा परिषद सदस्य व भाजप- जनसुराज्यचे नेते अशोकराव माने यांनी काढले.
सोमनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा पेठवडगाव येथे झाली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अशोकराव माळी होते.
अशोकराव माळी म्हणाले, संस्थेने प्रतिकूल परिस्थितीत मोठ्या हिमतीने संस्था चालविली. सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून पारदर्शी कारभार केला. त्यामुळे अल्पावधीत संस्थेची लक्षणीय प्रगती झाली. साडेबारा कोटी ठेवींचा टप्पा ओलांडला आहे. पाच शाखा असून लवकरच जिल्हा कार्य क्षेत्रास मंजुरी मिळेल व आणखी चार शाखा सुरू करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, संदेश कांबळे, गणेश नावाडे, भिवा कांबळे, सूर्यकांत हजारे यांची भाषणे झाली. यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केलेल्या संतोष सणगर, सचिन कागले, गणेश नावाडे यांचा सत्कार करण्यात आला. सभेस संस्थेच्या संस्थापिका रूपाली माळी, उपाध्यक्ष बजरंग माळी, चंद्रकांत माळी, भावानंद महाराज, संतोष जाधव, किशोर पाटील, महेश नाझरे आदींसह संचालक उपस्थित होते. स्वागत शाखाधिकारी नागनाथ माळी यांनी केले. आभार व्यवस्थापक कृष्णात माळी यांनी मानले. सूत्रसंचालन दिलीप पोवार यांनी केले.
फोटो ओळी : पेठवडगाव येथील सोमनाथ पतसंस्थेच्या वार्षिक सभेत अशोकराव माने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अशोकराव माळी, रूपाली माळी, प्रसाद खोबरे आदी उपस्थित होते.