आईचा क्रूरपणे खून केल्याप्रकरणी मुलगा दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 08:25 PM2021-07-02T20:25:52+5:302021-07-02T20:27:39+5:30

Court Kolhapur : कावळानाका परिसरातील वसाहतीमध्ये दारू पिण्यास पैसे दिले नाहीत, या कारणावरून स्वत:च्या आईचा चाकू, सुरा व सत्तुराने क्रूरपणे खून केल्याचा आरोप सिध्द झाल्याने सुनील रामा कुचकोरवी यास शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी दोषी ठरवले. मंगळवारी (दि.६) शिक्षेविषयी सुनावणी होणार आहे.

Son convicted of brutally murdering mother | आईचा क्रूरपणे खून केल्याप्रकरणी मुलगा दोषी

आईचा क्रूरपणे खून केल्याप्रकरणी मुलगा दोषी

Next
ठळक मुद्देशिक्षेविषयी सुनावणी मंगळवारी कावळानाका परिसरातील २०१७ ची घटना

कोल्हापूर : कावळानाका परिसरातील वसाहतीमध्ये दारू पिण्यास पैसे दिले नाहीत, या कारणावरून स्वत:च्या आईचा चाकू, सुरा व सत्तुराने क्रूरपणे खून केल्याचा आरोप सिध्द झाल्याने सुनील रामा कुचकोरवी यास शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी दोषी ठरवले. मंगळवारी (दि.६) शिक्षेविषयी सुनावणी होणार आहे.

शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कावळा नाका परिसरातील अग्निशामक केंद्राच्या मागील वसाहतीमध्ये २८ ऑगस्ट २०१७ रोजी दुपारी दोनच्या सुमारास संशयित सुनील याने आपली आई यल्लवा रामा कुचकोरवी (वय ६२) हिला दारू पिण्यास पैसे देत नाही. याकारणावरून चाकू, सुरी, सत्तूर अशा प्राणघातक हत्यारांनी खून केला होता. शेजाऱ्यांना चाहूल लागल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असता लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तपास करून न्यायालयात संशयिताविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. विवेक शुक्ल यांनी काम पाहिले.

याप्रकरणी १२ साक्षीदार तपासले. कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना परिस्थितीजन्य पुराव्यावरून न्यायालयाने सुनील याला दोषी ठरवले असून मंगळवारी (दि.६) शिक्षा जाहीर केली जाणार आहे. उभय पक्षांच्या तक्रारी ऐकून शिक्षा सुनावली जाणार आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. विवेक शुक्ल यांनी काम पाहिले. त्यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक एम. एम. नाईक यांनी मदत केली.

Web Title: Son convicted of brutally murdering mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.