Kolhapur: आईच्या डोक्यात खोरे घालून मुलाने केला खून, भाताची टोकण करताना झाला होता किरकोळ वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 12:00 PM2024-05-28T12:00:58+5:302024-05-28T12:01:23+5:30

घाव वर्मी लागल्याने जागीच मृत्यू  

Son killed his mother by hitting her on the head in Radhanagari Kolhapur, there was a minor dispute while biting rice | Kolhapur: आईच्या डोक्यात खोरे घालून मुलाने केला खून, भाताची टोकण करताना झाला होता किरकोळ वाद

Kolhapur: आईच्या डोक्यात खोरे घालून मुलाने केला खून, भाताची टोकण करताना झाला होता किरकोळ वाद

तुरंबे : बारडवाडी (ता. राधानगरी) येथे भाताची टोकण करताना आई, वडील आणि मुलगा यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून मुलाने आईच्या डोक्यात कुदळ मारल्याने मालुबाई श्रीपती मुसळे (वय ६२) या जागीच ठार झाल्या. मुलगा संदीप श्रीपती मुसळे (३५) याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी दुपारच्या दरम्यान येथील सुतारकीचा माळ या शेतात घडली. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे. घटनेची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बारडवाडी येथील श्रीपती मुसळे, मालुबाई मुसळे हे पती-पत्नी आणि मुलगा संदीप हे सोमवारी सकाळी भात टोकणीसाठी सुतारकीचा माळ येथील शेतात गेले होते. काम करता-करता मुलगा आणि आई-वडील यांच्यात वाद झाला. या वादातून संदीप याने कुदळ वडिलांना मारण्याचा प्रयत्न करत असताना ती आईच्या डोक्यात लागली. घाव वर्मी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. 

घटना गावात समजताच त्या ठिकाणी लोक जमले होते. वडील आणि मुलगा दोघांनाही दारूचे व्यसन आहे. संदीप सेंट्रिंग काम करतो. मयत मालुबाई यांच्यापश्चात पती, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक आप्पासाहेब पवार, राधानगरीचे पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांच्यासह राधानगरी पोलिस उपस्थित होते. सोळांकुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविछेदन केल्यानंतर मृतदेह रात्री उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास राधानगरी पोलिस करीत आहेत.

Web Title: Son killed his mother by hitting her on the head in Radhanagari Kolhapur, there was a minor dispute while biting rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.