स्टेजवरून पडून मुलाचा मृत्यू

By Admin | Published: May 4, 2017 11:14 PM2017-05-04T23:14:51+5:302017-05-04T23:14:51+5:30

बीड : तालुक्यातील पारगाव जप्ती येथे लग्नाच्या स्टेजवरून पडल्याने एका मुलाचा मृत्यू झाला.

Son's death from the stage | स्टेजवरून पडून मुलाचा मृत्यू

स्टेजवरून पडून मुलाचा मृत्यू

googlenewsNext

शिवाजी सावंत -- गारगोटी -लोटेवाडी (ता. भुदरगड) येथील पिण्याचा पाणीप्रश्न गेल्या ३० वर्षांपासून गंभीर बनत आहे. पाण्यासाठी लाखो रुपयांच्या नळपाणी योजनांसाठी निधी खर्च करूनही ग्रामस्थांना एकवेळही पाणी मिळत नाही. तहानलेल्या लोटेवाडीच्या पाणीप्रश्नी शासनला पाझर फुटणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाने टंचाईग्रस्त व जलयुक्त शिवार योजनेत लोटेवाडीचा समावेश केला आहे. याबाबत प्रशासनाकडून पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा, याकरिता उपाययोजना आखली जात आहे. मिणचे खुर्दपासून पुढील लोटेवाडी गावापर्यंत जलयुक्त शिवार योजनेतून काळम्मावाडी धरणाच्या कालव्याचे पाणी सायफनने मिळाल्यास गावची शेती सुजलाम्, सुफलाम् होईल. या कालव्याचे अंतर फक्त दीड कि.मी. आहे. लोकसहभाग व महाराष्ट्र शासन यांच्या पुढाकाराने हा प्रश्न निकाली निघू शकतो. कालव्याचे पाणीच तारणहार असून, तहानलेल्या लोटेवाडीला आता हा एकच पर्याय उरला आहे. शासनाने मिणचे खुर्द ते लोटेवाडी गावापर्यंतच्या कालव्याला पाणी योजनेसाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी लोटेवाडी ग्रामस्थांकडून होत आहे .
लोटेवाडी येथे सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. गावाला पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी शासनाने पाणीपुरवठा योजनांवर लाखो रुपये खर्च करूनही लोटेवाडी (ता. भुदरगड) गावाला गेली अनेक वर्षे घागरभर पाण्यासाठी महिलांसह आबालवृद्धांना वणवण भटकावे लागत आहे.
भुदरगड तालुक्यातील लोटेवाडी हे १४०० लोकवस्तीचे गाव. या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी शासनाने आतापर्यंत तीन नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या, पण त्या कुचकामी ठरल्या आहते. यानंतर सन १९९२-९४ मध्ये बसुदेव धनगरवाड्याजवळील जंगलातून ओढ्यावरील झऱ्याच्या उगमावर पाण्याची टाकी बांधून तीन किलोमीटर अंतरावरून सायफन पद्धतीने डोंगर उतारावरून पाणी आणण्यात आले. झऱ्याच्या पाण्याला पाझर आहे तोपर्यंतच पाणीपुरवठा होत होता. पाण्याचा नैसर्गिक स्रोत कमी होऊन ही योजना कुचकामी ठरली. गावामध्ये दोन हातपंप आहेत; पण पाणीपातळी खालावल्यामुळे एक घागर पाण्यासाठी दीर्घ वेळ थांबावे लागते. यासाठी अनेक महिला घागरी घेऊन पहाटेपासूनच रांगेत असतात. २०१२ साली राष्ट्रीय पेयजल योजनेतून २८ लाख ६० हजार रुपये खर्चाची नवीन नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. मिणचे खुर्द व मोरेवाडी दरम्यानच्या मोरओव्हळ या ओढ्यावर जलकुंभ बांधण्यात आला; पण ओढ्यालाच पाणी नसल्याने जलपातळी खालावून या योजनेतूनही पाणीपुरवठा होत नाही. गावासाठी तीन-तीन नळ पाणीपुरवठा योजना राबविल्या तरीही गेली कित्येक वर्षे गावास तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या होत्या; पण यावर ठोस उपाययोजना झाली नाही. घर बांधकाम, लग्न समारंभ, यात्रा, जत्रा यासाठी टँकरने पाणी विकत आणावे लागते. पाण्याच्या ओढाताणीमुळे महिला वर्ग व गावकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे शासनानेच लोटेवाडीच्या पाणीटंचाईवर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.


छोटे गाव; पण राजकारणाचा अड्डा
गावात गटा-तटाचे राजकारण होते. गावच्या विकासकार्यातही गटाचे राजकारण आडवे येते. पुढारीच लोटेवाडीच्या विकासकार्याला खीळ घालत आहेत. वर्षानुवर्षे न सुटलेले प्रश्न आमदार, खासदार, मंत्री किंवा अधिकारी यांना निवेदन देऊनही सोडविले जाऊ शकतात; पण भेटणार कोण? तर ग्रामपंचायतही यासाठी पुढाकारही घेत नाही. आम्ही निवडून देऊन काय उपयोग? असा सवालही त्रस्त ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

Web Title: Son's death from the stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.