सोनू तुला वीज बिल भरायचे नाय का..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:43 AM2021-03-13T04:43:04+5:302021-03-13T04:43:04+5:30

कोल्हापूर : सगळे प्रयत्न करूनही लॉकडाऊन काळातील वीज बिले भरण्यास ग्राहक तयार होत नसल्याने महावितरणने आता बिल भरण्याचे आवाहन ...

Sonu, do you want to pay the electricity bill? | सोनू तुला वीज बिल भरायचे नाय का..?

सोनू तुला वीज बिल भरायचे नाय का..?

Next

कोल्हापूर : सगळे प्रयत्न करूनही लॉकडाऊन काळातील वीज बिले भरण्यास ग्राहक तयार होत नसल्याने महावितरणने आता बिल भरण्याचे आवाहन करणाऱ्या गाण्याची चक्क ऑडिओ क्लिप गुरुवारी रिलिज केली. सोनू आमचा लाडका, वीज देतो बरं का, सोनूची कॉलर टाईट, वीज बिल भरायला मात्र वाटतंय वाईट, सोनू तुला वीज बिल भरायचं नाही का, असे हे गाणे ग्राहकांना ऐकवले जात आहे.

वीज बिलाचे आवाहन परिणामकारक ग्राहकांपर्यंत पोहोचावे म्हणून सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाही का, या गाजलेल्या गाण्यासारखेच गाणे महावितरणने तयार केले आहे. लॉकडाऊन काळात वीज वापरली आहे, तर त्याचे बिल भरणे ही आपली जबाबदारी आहे हे त्यातून सांगण्यात आले आहे.

दरम्यान स्थगिती उठवल्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील १७४ ग्राहकांचे कनेक्शन कट करून महावितरणने दणका दिला आहे. लॉकडाऊन काळातील वीज बिले न भरल्याने आर्थिक आरिष्ट्यात आलेल्या महावितरणने १ एप्रिलपासून एकही बिल न भरणाऱ्यांचे कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली होती. अवघ्या पंधरा दिवसात साडेचार हजारावर वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत; पण त्यानंतर हा प्रश्न विधानसभेत गेल्यानंतर त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. बुधवारी अधिवेशन संपल्यावर लगेच ही स्थगिती उठवून महावितरणला कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार घरगुतीचे १५, वाणिज्यचे १३५, औद्योगिकचे २४ ग्राहकांची कनेक्शन्स तोडण्यात आली.

जिल्ह्यात आजच्या घडीला ४ लाख १९ हजार घरगुती ग्राहकांकडे १७१ कोटी ९३ लाखाची थकबाकी आहे. ३८ हजार ९२० वाणिज्य ग्राहकांकडे ३१ कोटी १२ लाखाची बिले थकली आहेत. त्यांची आतापर्यंत २७९१ कनेक्शन तोडली आहेत. १५ हजार ६५४ ग्राहकांकडे ६७ कोटी ५० लाखाची थकबाकी अजूनही आहे. त्यांचे आतापर्यंत ९३८ कनेक्शन्स तोडली आहेत.

चौकट ०१

दिवसात १ कोटी १३ लाख भरले

कनेक्शन तोडण्याचा दणका सुरू असताना ग्राहकांनीही थकबाकी भरण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी दिवसभरात १८५४ ग्राहकांनी १ कोेटी १३ लाख रुपये महावितरणकडे जमा केले.

Web Title: Sonu, do you want to pay the electricity bill?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.