सोपानराव नि मुख्यमंत्री - भाग ५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:23 AM2021-09-25T04:23:23+5:302021-09-25T04:23:23+5:30

साेपानराव विचारमग्न अवस्थेत व्हरांड्यात फेऱ्या मारत असतानाच, विधानसभेतील विराेधी पक्षाचे मुख्य प्रताेद आमदार विठ्ठल शिंदे समाेर उभे राहिले. साेपानरावांना ...

Sopanrao and the Chief Minister - Part 5 | सोपानराव नि मुख्यमंत्री - भाग ५

सोपानराव नि मुख्यमंत्री - भाग ५

Next

साेपानराव विचारमग्न अवस्थेत व्हरांड्यात फेऱ्या मारत असतानाच, विधानसभेतील विराेधी पक्षाचे मुख्य प्रताेद आमदार विठ्ठल शिंदे समाेर उभे राहिले.

साेपानरावांना रामराम करून आ. शिंदे म्हणाले, ‘सर, तुमचे भले न चाहणाऱ्या विराेधकांनी तुमच्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे शिकायत केली आहे!’

‘अहाे शिंदे सरकार, मला ते माहीत आहे! पण विराेधकांनी मुख्यमंत्र्यांकडे नेमकी काय तक्रार केली आहे?’

‘हेच की, तुम्ही पक्ष आणि मुख्यमंत्री यांच्याविरुद्ध बंड पुकारले आहे अन् स्वत:ला आपण मुख्यमंत्री आहाेत, असे दाखवीत संपूर्ण परिसरात पाेस्टर्स फडकविले आहेत. येत्या साेमवारी मुख्यमंंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत अन् त्यावेळी या प्रकरणासंबंधी निर्णय जाहीर करणार आहेत.’

आ. शिंदे हे सर्व सांगत असताना, साेपानराव यांना साेमनाथ आत येताना दिसला. त्यांना खूप बरे वाटले; पण आ. शिंदे यांचा चेहरा साेमनाथला पाहताच गाेरामाेरा झाला. साेमनाथकडे तिरक्या नजरेने पाहत आ. शिंदेही चालते झाले.

आपल्याविषयी साेपानरावांच्या मनात खूप गैरसमज निर्माण झाले आहेत हे साेमनाथने आधीच ताडले हाेते. त्यांच्या राेषाचा बळी हाेण्यापूर्वीच त्याने त्यांच्या चरणांवर चक्क लाेटांगण घातले. गहिवरल्या स्वरांत त्याने साेपानरावांना विनंती केली, ‘सर, मी तुम्हाला काही महत्त्वाचे रहस्य सांगणार आहे, त्यानंतरही आपणास मी दाेषी आहे असे वाटल्यास मला काेणतीही कठाेर शिक्षा करा!’

‘सर, आपणास साळसूदपणाचा भाव आणून भेटीस आलेले दाेघेही आमदार (माेरे-शिंदे) पाेस्टर प्रकरणात यांचाच हात आहे. ज्या ठिकाणी हे पाेस्टर्स छापण्यासाठी दिले हाेते, तिथे हेच दाेघेजण पाेहाेचले. त्यांनी, पाेस्टर्स छपाई सुरू हाेण्यासाठी तिथल्या कारागिराला सांगितले की, ‘हे आमचेच काम आहे. त्यात आमच्या नजरेस आलेली त्रुटी सुधारण्यासाठी आम्ही आलाे आहाेत.’

त्या दाेघांनी पाेस्टरवरील ठळक अक्षरांत असलेल्या, ‘साेपानराव... मुख्यमंत्री या नावाच्या मध्यात फिक्कट अक्षरांत ‘व’ हे अक्षर ठेवले. आता मजकूर असा झाला हाेता, ‘साेपानराव व मुख्यमंत्री’

मी पुन्हा ते पाेस्टर पाहिले नाही. त्यामुळेच हे संकट ओढवले.

पत्रकार परिषदेच्या एक दिवस आधी साेपानरावांनी आपले जुने स्नेही, राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष संकेत गणपुले यांना निवासस्थानी बाेलावून घेतले. पाेस्टरवरून घडलेली घटना अन् विराेधकांनी पाेस्टरवर केलेली सुधारणा (?) यासंबंधी पत्रकार गणपुले यांनी साद्यंत माहिती घेतली. हा विराेधकांचा डाव असल्याची नाेंद त्यांनी घेतली अन् ‘मुळीच करू नका, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहाेत’ असा दिलासा मित्रवर्य साेपानराव यांना दिला.

प्रत्यक्ष पत्रकारांच्या बैठकीत, संघाचे अध्यक्ष संकेत गणपुले यांनी मुख्यमंत्र्यांना घटनांची साद्यंत माहिती दिली अन् विराेधकांनी कसा डाव रचना हे पाेस्टरवरील कारस्थानसुद्धा त्यांच्या निदर्शनास आणले. मा. मुख्यमंत्री यांनी संपूर्ण खात्री केल्यानंतर निर्णय जाहीर केला की, साेपानराव यांची या प्रकरणात काहीही चूक नसल्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करण्याचा प्रश्नच नाही. ते पुनश्च राज्यमंत्री सांभाळतील. मी त्यांचे अभिनंदन करताे.’ राज्यमंत्री साेपानराव यांनी सगळ्यांचे ताेंड गाेड केले हे सांगणे न लगे!

---------------------डाॅ. धंडिराज शंकर महाराज कहाळेकर

आयुर्वेद - प्रवीण (मुंबई)

आर.बी. ४ ‘तीर्थ गार्डन’ सर्किट हाऊसमागे, कदमवाडी रस्ता, ताराबाई पार्क, काेल्हापूर-४१६००३

Web Title: Sopanrao and the Chief Minister - Part 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.