बुधले, जाधव यांच्या पॅनेलचा दणदणीत विजय

By admin | Published: February 9, 2015 12:30 AM2015-02-09T00:30:17+5:302015-02-09T00:36:36+5:30

उद्यम सोसायटी निवडणूक : तेंडुलकर यांच्या ‘लोकशाही प्रेरित’ पॅनेलचा धुव्वा; अध्यक्ष, उपाध्यक्ष पुढील आठवड्यात

The sounding victory of the panel of Budhwale, Jadhav | बुधले, जाधव यांच्या पॅनेलचा दणदणीत विजय

बुधले, जाधव यांच्या पॅनेलचा दणदणीत विजय

Next

कोल्हापूर : विकासाभिमुख कामकाजाची ग्वाही देत सभासदांचा ‘कौल’ आपल्याकडे वळविणाऱ्या दिनेश बुधले व चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू प्रेरित सत्तारुढ-युवा उद्योजक पॅनेलने कोल्हापूर उद्यम को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १३ जागांवर रविवारी दणदणीत विजय मिळविला. सभासदाभिमुख कामकाजाचे वचन देत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उतरलेल्या रवींद्र तेंडुलकर यांच्या लोकशाहीप्रेरित पॅनेलचा धुव्वा उडाला. सभासदांनी यातून ‘सब कुछ’ सत्तारुढ पॅनेल हे दाखवून दिले. विजयी झालेल्यांमध्ये सात नवीन चेहऱ्यांना सोसायटीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.
असोसिएशनच्या २०१५-१९ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात जोरदार प्रचार केला. सोसायटीच्या इतिहासात यावर्षीच्या निवडणुकीत सर्वाधिक ४१८ इतके मतदान झाले. मतदान अधिक झाल्याने सत्तांतर होईल, असा अनेकांनी व्यक्त केलेला अंदाज मतदारांनी चुकीचा ठरविला. उलट, सत्तारुढांच्या ‘राजर्षी शाहू प्रेरित’चे सर्व उमेदवारांना निवडून दिले. विजयी उमेदवार असे (कंसात मिळालेले मतदान) - कारखाना मतदारसंघ : संजय अंगडी (२६६), हिंदुराव कामते (२२७), प्रकाश चरणे (२८२), चंद्रकांत चोरगे (२३०), अशोक जाधव (२०७), चंद्रकांत जाधव (२६६), दिनेश बुधले (२२१). सोसायटी मतदार संघ : नितीन वाडीकर (३१८). इतर मागासवर्गीय सदस्य : अशोक सुतार (२१६). महिला राखीव : वृषाली कुलकर्णी (२३६), संगीता नलवडे (२७६). राजन सातपुते (अनुसूचित जाती जमाती गट) आणि चंद्रकांत मुळे (भटक्या विमुक्त गट जाती व विशेष मागास प्रवर्ग) यांची बिनविरोध निवड झाली.
सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान झाले. त्यानंतर सात वाजता मतमोजणी पूर्ण झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नितीन माने, तर साहाय्यक म्हणून मिलिंद ओतारी, उदय उलपे, प्रकाश महाडिक यांनी काम पाहिले. पुढील आठवड्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व खजानिस आदींच्या निवडीची प्रक्रिया होणार आहे. या निवडीकडे ुकोल्हापूरच्या उद्योगजगताचे लक्ष असणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The sounding victory of the panel of Budhwale, Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.