दक्षिण विधानसभा मतदारसंघ रोल मॉडेल बनविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:24 AM2021-03-10T04:24:18+5:302021-03-10T04:24:18+5:30
कळंबा : गेल्या पाच वर्षांत दक्षिण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट उपनगरांच्या मूलभूत प्रश्नांचे निराकरण झालेच नसल्याने उपनगरे विकासापासून वंचित राहिली. ...
कळंबा : गेल्या पाच वर्षांत दक्षिण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट उपनगरांच्या मूलभूत प्रश्नांचे निराकरण झालेच नसल्याने उपनगरे विकासापासून वंचित राहिली. आता मात्र जास्तीत जास्त विकासनिधी उपलब्ध करून दक्षिण विधानसभा मतदारसंघ विकासाचा रोल मॉडेल बनवणार असल्याची ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी मंगळवारी दिली. प्रभाग ७७ शासकीय मध्यवर्ती कारागृह येथील कात्यायनी कॉम्प्लेक्स येथे आमदार फंडातून उभारण्यात येणाऱ्या वीस लाखांच्या सांस्कृतिक हॉलच्या प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर अश्विनी रामाणे होत्या.
यावेळी रामाणे यांनी प्रभागाच्या मूलभूत समस्या मार्गी लावण्यात यश आल्याने समाधान व्यक्त केले. याप्रसंगी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक मधुकर रामाणे, रवींद्र मोरे, श्रीकांत मनोळे, अमर रामाणे उपस्थित होते.
फोटो : ०९ कळंबा पाटील
फोटो ओळ : कोल्हापुरातील प्रभाग ७७, शासकीय मध्यवर्ती कारागृह येथे सांस्कृतिक हॉलच्या कामाचा प्रारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी महापौर अश्विनी रामाणे, माजी नगरसेवक मधुकर रामाणे अन्य मान्यवर व नागरिक उपस्थित होते.