शिवराय, ताराराणींच्या जयघोषात दुमदुमली नगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:10 AM2019-04-22T01:10:29+5:302019-04-22T01:10:34+5:30

कोल्हापूर : जय भवानी, जय शिवाजी, ताराराणींच्या नावाच्या जयघोषात, फुलांसह विद्युत रोषणाईने सजविलेल्या रथात शिवराय व ताराराणींच्या प्रतिमा, मिरवणुकीच्या ...

Souvenir city in Shivarai, Taranani's hymn | शिवराय, ताराराणींच्या जयघोषात दुमदुमली नगरी

शिवराय, ताराराणींच्या जयघोषात दुमदुमली नगरी

googlenewsNext

कोल्हापूर : जय भवानी, जय शिवाजी, ताराराणींच्या नावाच्या जयघोषात, फुलांसह विद्युत रोषणाईने सजविलेल्या रथात शिवराय व ताराराणींच्या प्रतिमा, मिरवणुकीच्या मार्गावर रांगोळी, फुलांचा गालिचा, महालक्ष्मी ढोल पथकाचा नादब्रह्म, घोडेस्वार, भालदार, चोपदारासह शाही लवाजमा, छत्रपती शिवराय व ताराराणींच्या पराक्रमाच्या गाथा सांगणारी गीते अशा उत्साही वातावरणात रविवारी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती ताराराणींचा रथोत्सव साजरा झाला.
चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने दख्खनचा राजा जोतिबा यात्रेसाठी आलेल्या राज्यासह परराज्यांतील भाविकांना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती ताराराणी यांच्या कार्याची माहिती व्हावी, या उद्देशाने राजर्षी शाहू महाराजांनी या रथोत्सवाची सुरुवात केली. तेव्हापासून आजतागायत ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. छत्रपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शाहू छत्रपती, युवराज मालोजीराजे, यौवराज शहाजीराजे, यशराजराजे यांच्या हस्ते रथाचे पूजन झाले. महालक्ष्मी प्रतिष्ठान ढोलपथक आणि बॅँडपथकाने मिरवणुकीत रंग भरले.

Web Title: Souvenir city in Shivarai, Taranani's hymn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.