जिल्ह्यात ७६ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:18 AM2021-06-25T04:18:27+5:302021-06-25T04:18:27+5:30

कोल्हापूर : पाऊस सुरु झाल्याच्या पंधरा दिवसांतच जिल्ह्यात पेरणीक्षेत्राने तब्बल ७६ टक्केवर झेप घेतली आहे. साधारणपणे जून महिन्यात २० ...

Sowing completed on 76% area in the district | जिल्ह्यात ७६ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण

जिल्ह्यात ७६ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण

googlenewsNext

कोल्हापूर : पाऊस सुरु झाल्याच्या पंधरा दिवसांतच जिल्ह्यात पेरणीक्षेत्राने तब्बल ७६ टक्केवर झेप घेतली आहे. साधारणपणे जून महिन्यात २० ते ३० टक्क्यांवर असणारा खरीप पेरा यंदा मात्र जूनच्या तिसऱ्या आठवड्यातच दुप्पटी, तिप्पटीने वाढला आहे. सर्वाधिक ८२ टक्के पेरणी साेयाबीनची झाली आहे. त्याखालोखाल भुईमूग ६७ टक्केवर पेरणी झाली आहे. भाताची रोप लागण होणारे डोंगरी तालुके वगळता इतरत्र पेरणीचा टक्का चांगलाच सुधारला असून या हातकणंगले, शिरोळ, कागल हे तालुके आघाडीवर आहेत.

दरवर्षी जूनमध्ये पेरण्या सुरु होतात. पावसाचा अंदाज घेऊन जुलैपर्यंत त्या सुरुच राहतात. यावर्षी मात्र पेरण्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासू्नच सुरुवात झाली. मृग नक्षत्र निघेपर्यंत जिल्ह्यात जवळपास ३५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. त्यातच कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे निमित्त जिल्ह्यात पाच-सहा दिवस तुफानी पाऊस कोसळला. त्यामुळे पेरण्यांचा वेग आणखी वाढला. पिकांची उगवणही चांगली झाली. केवळ नदीकाठ व सखल भागात पाणी साचून राहिल्याने पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला, पण ऊन पडल्याने या पिकांना बऱ्यापैकी जीवदान मिळाले.

जिल्ह्यात भाताच्या धूळवाफ पेरण्यांची उगवण चांगली झाली असून आता रोप लागण सुरू झाल्याने पुढील आठवड्यात पेरणीची टक्केवारी आणखी वाढणार आहे. दरम्यान आता पावसाने काहीशी ओढ दिल्याने रोप लागणीला म्हणावा तसा वेग नाही. अजून आठ दिवस तुरळकच पाऊस असणार आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात पाऊस जोर धरणार असल्याने त्याप्रमाणे लागणीचे नियोजन केले जात आहे.

यावर्षी सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने सोयाबीनच्या पेरणीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ४१ हजार ५३८ हेक्टर आहेत, त्यापैकी ३४ हजार २०३ हेक्टरवर म्हणजेच ८२ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

प्रतिक्रिया

यावर्षी वादळी पाऊस व त्यानंतर मृग नक्षत्रातही चांगला पाऊस झाल्याने पेरण्या लवकर पूर्ण झाल्या आहेत. पिकांची उगवणही समाधानकारक आहे. कोल्हापूर पेरणीत राज्यात आघाडीवर दिसत आहे.

ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

जिल्ह्यातील पीकनिहाय पेरणी (हेक्टरमध्ये)

पीक सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

भात : ९३ ७४२ ४७०१८ ५०.१६

ज्वारी : २३३१ १२६४ ५४.२३

भुईमूग : ३९१७६ २६५५३ ६७.७८

सोयाबीन : ४१५३८ ३४२०३ ८२.३४

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी झालेले

हातकणंगले ४४८३० ३७३१३

शिरोळ २८०१९ २८०७१

पन्हाळा २८६२८ २१४४९

शाहूवाडी २०२६१ १११९४

राधानगरी २८९५० १६७८०

गगनबावडा ६५९८ ४३१८

करवीर ४०३०१ ३१८९५

कागल ४२७७० ३७२०२

गडहिंग्लज ३९०८५ ३६०००

भूदरगड २६३०८ १८७२३

आजरा २१९८४ १२२८६

चंदगड ३५४२१ १९४९१

एकूण ३६३१५४ २७४७२३

Web Title: Sowing completed on 76% area in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.