शिवाजी विद्यापीठात ‘स्पार्क’ महोत्सव ऑनलाईन रंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:17 AM2021-06-21T04:17:49+5:302021-06-21T04:17:49+5:30

येथील ‘निर्मिती’ जाहिरात संस्थेचे अनंत खासबारदार यांच्या हस्ते चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यांनी ‘कोविड-१९ आणि आरोग्यविषयक जाहिराती’ या विषयावर ...

The 'Spark' festival was held online at Shivaji University | शिवाजी विद्यापीठात ‘स्पार्क’ महोत्सव ऑनलाईन रंगला

शिवाजी विद्यापीठात ‘स्पार्क’ महोत्सव ऑनलाईन रंगला

googlenewsNext

येथील ‘निर्मिती’ जाहिरात संस्थेचे अनंत खासबारदार यांच्या हस्ते चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यांनी ‘कोविड-१९ आणि आरोग्यविषयक जाहिराती’ या विषयावर बीजभाषण केले. सध्या अनेक जण समाजोपयोगी कामे करत आहेत. याचे भान राखून हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असून लघुपट हे त्यासाठी उत्तम माध्यम आहे, असल्याचे खासबारदार यांनी सांगितले. या महोत्सवात मल्हार जोशी, आकाश बोकमूरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पूर्णविराम’ आणि शैलेश कोरे यांच्या ‘वाकळ’ या लघुपटाचेही प्रदर्शन झाले. विभागाचे विद्यार्थी मनाली पाटील (पॉझिटिव्ह ॲप्रोच), अनुराधा धामणे (लेट्स मास्कअप), निहारिका देशपांडे (सुनो पँडेमिक), प्रणाली पवार (स्टे होम, स्टे सेफ), अतुल होवाळे (यूज मास्क, डिस्पोझ प्रॉपरली), विनायक लोहार (जर्म्स आर नॉट फॉर शेअरिंग), रुणाल भोई (डोन्ट लेट जर्म्स गेट यू डाऊन), सोमदत्त देसाई (वी द ह्युमन) या जाहिरातपर लघुपटांचे प्रदर्शन झाले. धावपटू मिल्खा सिंग यांना आदरांजली वाहण्यात आली. विभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांनी महोत्सवाचे आयोजन केले. प्रा. डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे यांनी महोत्सवासाठी विशेष साहाय्य केले. सरफराझ मुल्ला यांनी आभार मानले.

Web Title: The 'Spark' festival was held online at Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.