सभापती, बीडिओ, अधिकाऱ्यांनी घेतले तास

By admin | Published: November 21, 2014 11:40 PM2014-11-21T23:40:12+5:302014-11-22T00:05:03+5:30

‘करवीर’मधील शाळांत उपक्रम : दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी ‘एक दिवस शाळेसाठी’

Speakers, radioactive, hours taken by the officials | सभापती, बीडिओ, अधिकाऱ्यांनी घेतले तास

सभापती, बीडिओ, अधिकाऱ्यांनी घेतले तास

Next

कसबा बावडा : शैक्षणिक गुणवत्ता अभियानांतर्गत एक दिवस शाळेसाठी अर्थात ‘प्रेरणा दिवस’हा उपक्रम काल, गुरुवारी करवीर तालुक्यातील शाळांमध्ये राबविण्यात आला. त्यानुसार गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी उजळाईवाडी शाळेत, तर गटशिक्षणाधिकारी आर. जी. चौगले यांनी वाशीच्या कुमार विद्यामंदिर शाळेत पाठ्यपुस्तकातील धडा शिकविला. यावेळी शाळेच्या कामकाजाची पाहणी करण्यात आली. सभापती पूनम जाधव यांनी उचगावच्या कुमार कन्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
करवीरचे माजी सभापती दिलीप टिपुगडे यांनी कळंबा येथे, तर सदस्या स्मिता युवराज गवळी यांनी पाचगाव येथील शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंचायत समितीच्या अन्य सदस्यांनीही आपल्या मतदारसंघातील शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Web Title: Speakers, radioactive, hours taken by the officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.