विशेष बंदोबस्ताची आखणी

By admin | Published: August 25, 2016 12:36 AM2016-08-25T00:36:56+5:302016-08-25T00:38:52+5:30

पोलिसांची कठोर भूमिका : डॉल्बी लावणाऱ्यांवर तत्काळ कारवाई

Special gunshot | विशेष बंदोबस्ताची आखणी

विशेष बंदोबस्ताची आखणी

Next

एकनाथ पाटील -- कोल्हापूर --कोल्हापूरकरांचा नागरी उत्सव ठरणाऱ्या गणेशोत्सवातील बंदोबस्तासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. गतवर्षी डॉल्बी लावणार नाही, असे म्हणणारेच डॉल्बी लावून पुढे येतात. त्यामुळे यंदाच्या वर्षी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्याच्या सूचना पोलिस निरीक्षकांना दिल्या आहेत. उत्सवकाळात रस्त्यावरील वाहतूक कोंडी, अनुचित प्रकार टाळण्यासाठी विशेष बंदोबस्ताची आखणी केली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कोल्हापूर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे; त्यामुळे सणासुदीच्या काळात विशेषत: गणेशोत्सव व नवरात्रकाळात पोलिस अधिक दक्ष असतात. यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. कोल्हापूर शहरात गेल्या वर्षी बाराशेहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे होती, तर अडीच लाखांहून घरगुती गणपती होते. यंदा त्यामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या धर्तीवर पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी जिल्'ाचा आढावा घेतला. शहरातील प्रमुख मार्गांची ते स्वत: पाहणी करणार आहेत. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्याच्या सूचना त्यांनी निरीक्षकांना केल्या आहेत. गोपाळकाला व गणेशोत्सवात शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी संपूर्ण पोलिस दल रस्त्यांवर उतरणार असल्याचे पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी सांगितले.
फेरीवालामुक्त परिसर
गणेशोत्सवात मोठ्या संख्येने भाविक रस्त्यांवर उतरत असतात. प्रसिद्ध सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. अशा ठिकाणी पदपथावरील फेरीवाल्यांचा मोठा अडसर असतो. त्यासाठी पोलिसांनी फेरीवाला पथक तयार केले आहे. ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फेरीवाल्यांकडील पिपाणी आणि तत्सम वस्तूंबरोबरच रस्त्यावरील खाद्यपदार्थ बनविणाऱ्या फेरीवाल्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. स्टोव्ह अथवा गॅसवर खाद्यपदार्थ बनविले जातात. त्यामुळे दुर्घटना घडू शकते. विशेष फेरीवाला पथक अशा वस्तू जप्त करून कारवाई करणार आहे. वाहतुकीस अडथळा होऊ नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत जमाव नियंत्रणात आणण्यासाठी गणेशोत्सव मंडळांचा परिसर फेरीवालामुक्त करण्यात येणार आहे.
विशेष पथकांची नियुक्ती
महिला आणि बालकांच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. छेडछाडविरोधी पथक, मोबाईल चोरीविरोधी पथक, सोनसाखळी चोरीविरोधी पथक, आदी विशेष पथके यंदाही कार्यरत राहणार आहेत.


पाच मुद्द्यांवर अधिक भर
गणेशोत्सवाच्या बंदोबस्तामध्ये प्रामुख्याने जमाव नियंत्रण, कायदा आणि सुव्यवस्था, मिरवणुकीचे संरक्षण, रस्त्यावरील गुन्हे रोखणे, वाहतूक व्यवस्था सुरळीत राखणे या पाच मुद्द्यांवर अधिक भर दिला जातो. त्यानुसार पोलिसांनी बंदोबस्ताची व्यूहरचना आखली आहे. विसर्जन मिरवणूक हा यामधील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. मिरवणुकीदरम्यान गणेशाची मूर्ती आपल्या स्थानावरून विसर्जन स्थळापर्यंत जाईपर्यंत विविध प्रकारचा बंदोबस्त असतो. यावेळी अनेक मार्ग बंद केले जाणार आहेत. तसेच अनेक मार्ग एकदिशा केले जाणार आहेत. ज्या मार्गावर विसर्जन मिरवणूक जाईल, तेथे अगदी सायकलीलासुद्धा पार्किंग करायला परवानगी नाकारली आहे. याबाबत नागरिकांना सतत ध्वनिक्षेपकामार्फत सूचना दिल्या जाणार आहेत. बाहेरील जिल्'ांतून काही प्रमाणात पोलिस बंदोबस्त मागवून घेतला जाणार आहे.

Web Title: Special gunshot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.