अण्णासाहेब डांगे यांची आज विशेष मुलाखत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:27 AM2021-08-13T04:27:51+5:302021-08-13T04:27:51+5:30
विवेकानंद महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा कोल्हापूर : येथील विवेकानंद महाविद्यालयामध्ये ग्रंथपाल दिन गुरुवारी साजरा ...
विवेकानंद महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा
कोल्हापूर : येथील विवेकानंद महाविद्यालयामध्ये ग्रंथपाल दिन गुरुवारी साजरा करण्यात आला. ग्रंथालयाच्या विकासात डॉ. एस .आर. रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे. वाचक ग्रंथालयाभिमुख होण्यासाठी नवे प्रयोग हाती घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. सध्या ऑनलाईन ग्रंथालयाचे महत्त्व वाढत आहे. त्यादृष्टीने ग्रंथपालांनी ई-लायब्ररीची संकल्पना राबवली पाहिजे, असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. नीता पाटील यांनी केले. डॉ. रंगनाथन यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयाचे उत्कृष्ट वाचक डॉ. कैलास पाटील, डी. बी. पुजारी, प्रमोदिनी जाधव, तमन्ना देसाई यांचा अधीक्षक अनिल पवार यांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. सहायक ग्रंथपाल हितेंद्र साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. प्रियांका दुर्गुळे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र साळुंखे यांनी आभार मानले.