फासेपारधी समाजमंदिर, संकुल अनुदानासाठी विशेष सभा घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:23 AM2021-03-19T04:23:36+5:302021-03-19T04:23:36+5:30
इचलकरंजी : ठक्करबाप्पा योजनेंतर्गत फासेपारधी समाजसाठी समाजमंदिर व समाज संकुलासाठी अनुदान मिळावे यासाठी नगरपालिकेने विशेष सभेचे आयोजन करावे, अशी ...
इचलकरंजी : ठक्करबाप्पा योजनेंतर्गत फासेपारधी समाजसाठी समाजमंदिर व समाज संकुलासाठी अनुदान मिळावे यासाठी नगरपालिकेने विशेष सभेचे आयोजन करावे, अशी मागणी आदिवासी फासेपारधी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ताराराणी आघाडीचे पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे यांनी नगराध्यक्षा अलका स्वामी व मुख्याधिकारी शरद पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनामध्ये प्रकल्प कार्यालयाचे वरिष्ठ निरीक्षक योगेश खंदारे यांनी बुधवारी (दि. १७) इचलकरंजी नगरपालिकेस भेट दिली. यावेळी उपनगर अभियंता आर.डी. हावळ यांच्याशी ठक्करबाप्पा योजनेसंदर्भात चर्चा केली. यामध्ये पारधी समाजसाठी समाजमंदिर व समाज संकुलासाठी प्रत्येकी दहा लाखांप्रमाणे एकूण २० लाख ३१ मार्च २०२१पर्यंत देण्यात येतील. परंतु यासाठी नगरपालिकेकडून विशेष सभा बोलावून ठराव पत्र, पारधी समाजाच्या लोकसंख्येचे पत्र, समाजमंदिर व समाज संकुल याचा एस्टिमेट प्लॅन व तांत्रिक मागणी पत्र असे प्रस्ताव सोमवारपर्यंत दिल्यास निधी मंजूर करून देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात नगरपालिकेने समाजमंदिर व समाज संकुलकरिता प्रस्ताव लवकर तयार करून देण्यात यावा, असे म्हटले आहे.