‘विशेष अधिकारा’त होणार हद्दवाढ
By admin | Published: June 19, 2014 01:09 AM2014-06-19T01:09:48+5:302014-06-19T01:13:48+5:30
कोल्हापूर हद्दवाढीस राज्य शासन अनुकूल
पणजी : राज्यात स्वच्छतेची नितांत गरज असून, त्यासाठी डिसेंबर
२०१५ पर्यंत गोवा कचरामुक्त करू, असा विश्वास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी क्रांतिदिन कार्यक्रमात व्यक्त केला. प्लास्टिकचा वापर कमी करण्यावरही त्यांनी
भर दिला.
पणजी येथील आझाद मैदानावरील क्रांतिदिन सोहळ्यास राज्यपाल भारत वीर वांच्छू, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, सहकारमंत्री पांडुरंग ढवळीकर, उपसभापती अनंत शेट हे उपस्थित होते. त्यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.
लोकांनी सकारात्मक दृष्टी अंगिकारून विधायक योजनांना
विरोध करण्याची वृत्ती सोडावी, असे आवाहन या वेळी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी केले. राज्याच्या विकासासाठी स्वातंत्र्यसैनिकांची मदत अपेक्षित असल्याचे सांगून, स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना
नोकरी देण्याचा प्रश्न वर्षभरात
सोडवू, असे आश्वासन पर्रीकर
यांनी या वेळी दिले. गोवा,
दमण व दिव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे
अध्यक्ष श्यामसुंदर नागवेकर, गोवा स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष
चंद्रकांत केंकरे यांचीही या वेळी भाषणे झाली. विविध खात्यांचे प्रमुख,
सरकारी अधिकारी, कर्मचारी वर्ग, स्वातंत्र्यसैनिक व नागरिक या वेळी उपस्थित होते.