दिव्यांग नेमबाज ‘जानकी’ला विशिष्ट व्हीलचेअरची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:18 AM2021-06-06T04:18:22+5:302021-06-06T04:18:22+5:30
मागील वर्षी दिव्यांग नेमबाज जानकीची १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. ती सध्या कोरोनामुळे घरातूनच ...
मागील वर्षी दिव्यांग नेमबाज जानकीची १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. ती सध्या कोरोनामुळे घरातूनच सराव करीत आहे. आर्थिक अडचणींमुळे तिला खास दिव्यांगांकरिता असलेली व्हीलचेअर घेणे शक्य नव्हते. ही गरज आेळखून फोर्टीवनर क्लब ऑफ कोल्हापूर ने तिला ‘शेअर युअर जाॅय’ या उपक्रमाअंतर्गत व्हीलचेअर भेट देण्याचे ठरविण्यात आले. त्यानूसार क्लबच्या सभासदांच्या माध्यमातून ४० हजार रुपये उभे करीत चेन्नईहून ही खास व्हीलचेअर बनवून घेतली. ती शनिवारी कसबा बावडा येथे तिला सुपुर्द केली. या उपक्रमासाठी बिपीन मिरजकर, मनीष संबर्गी, महेंद्र पाटील, रवी डोली, वासुदेव कलघटगी, शिवयोगी डंगण्णवार, मदन देशपांडे, रवी पाटील, प्रसाद गुळवणी, विक्रम देसाई, अलिम, एस. वाजये कन्वीनर प्रसाद यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास अवधूत विशेष मुलांच्या शाळेच्या संचालिका स्वाती गोखले, रवी पाटील, विक्रम देसाई, महेंद्र पाटील, महेश खांडके, अनुपमा पाटील, गौरी खांडके, शीतल फराकटे आदी उपस्थित होते.
फोटो : ०५०६२०२१-कोल-जानकी मोकाशी
आेळी : कोल्हापुरातील राष्ट्रीय दिव्यांग नेमबाज जानकी मोकाशी हिला फोर्टीवनर क्लब ऑफ कोल्हापूरतर्फे नेमबाजी करिता लागणारी विशिष्ट प्रकारची व्हीलचेअर शनिवारी भेट देण्यात आली. यावेळी उत्तम फराकटे, स्वाती गोखले आदी उपस्थित होते.