महालक्ष्मी एक्स्प्रेसचा वेग वाढवा, संभाजीराजे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:38 PM2019-06-21T13:38:07+5:302019-06-21T13:39:10+5:30
कोल्हापूर येथून मुंबईसाठी सुटणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसचा वेग वाढविण्याची मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोएल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत गोएल यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.
कोल्हापूर : येथून मुंबईसाठी सुटणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसचा वेग वाढविण्याची मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोएल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत गोएल यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.
महालक्ष्मी एक्सप्रेस या रेल्वेमुळेकोल्हापूरसहित संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मुंबईशी जोडला गेला आहे; परंतु आज गाडीचा प्रवास खूपच वेळखाऊ आहे. ५१८ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तिला तब्बल ११ तासांचा वेळ लागतो. म्हणजे गाडीचा सरासरी वेग केवळ ताशी ४७ किलोमीटर आहे. जो व्यवहार्य नाही. तो वाढवून कमीत कमी ६० किलोमीटर प्रतितास करावा. त्यामुळे प्रवाशांचा दोन ते सव्वादोन तासांचा वेळ वाचेल. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व रेल्वे प्रवाशांना याचा फायदा होईल, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत योग्य ते निर्देश देण्याची ग्वाही यावेळी पीयूष गोएल यांनी दिली. तसेच कोल्हापूर आणि परिसरातील रेल्वेच्या प्रश्नांबाबत आपण सकारात्मक असल्याचे त्यांनी यावेळी खासदार संभाजीराजे यांना सांगितले.