सभापती बदलाच्या हालचाली गतिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:23 AM2017-08-26T00:23:08+5:302017-08-26T00:25:20+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सर्जेराव पाटील-गवशीकर यांची नेत्यांनी नेमून दिलेली मुदत १९ सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे नवीन सभापती निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सर्जेराव पाटील-गवशीकर यांची नेत्यांनी नेमून दिलेली मुदत १९ सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे नवीन सभापती निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. नेत्यांमध्ये झालेल्या समझोत्यानुसार यावेळेला कागलला सभापतिपद मिळणार असून, कृष्णात पाटील यांची निवड निश्चित मानली जात आहे.
दोन वर्षांपूर्वी बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेस, जनसुराज्य, शेकाप, सतेज पाटील यांच्या आघाडीने १९ पैकी १५ जागा जिंंकून सत्ता कायम राखली. आघाडीमध्ये झालेल्या समझोत्यानुसार पहिल्या वर्षी ‘जनसुराज्य’चे परशराम खुडे यांना सभापतिपदाची, तर आमदार सतेज पाटील यांच्या गटाचे विलास साठे यांना संधी देण्यात आली
. दुसºया वर्षी राष्टÑवादीचे सर्जेराव पाटील यांना सभापती, तर ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या गटाच्या आशालता पाटील यांना उपसभापतिपदाची संधी मिळाली. सभापतिपद हे पुन्हा राष्टÑवादीकडे राहणार असून, कृष्णात पाटील यांना संधी मिळणार हे जवळपास निश्चित मानले जाते. सभापती निवडीनंतरच उपसभापती आशालता पाटील यांचा राजीनामा होऊ शकतो. या पदासाठी ‘शेकाप’चे अमित कांबळे, मानसिंगराव गायकवाड गटाचे शेखर येडगे यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.
असा आहे सभापतिपदासाठी आघाडीचा फॉर्म्युला
पहिल्या वर्षी - जनसुराज्य
दुसºया वर्षी- राष्टÑवादी
तिसºया वर्षी- राष्टÑवादी
चौथ्या वर्षी - आमदार सतेज पाटील गट
पाचव्या वर्षी- जनसुराज्य