कोल्हापूर, सांगलीत वीजबिल वसुलीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 11:01 AM2021-03-02T11:01:58+5:302021-03-02T11:03:14+5:30

mahavitaran Kolhapur sangli News- कोल्हापूर, सांगलीच्या ग्राहकांचा वीज बिलाचा भरणा करण्याकडे कल वाढला आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वर्गवारीतील गतवर्षी एप्रिलपासून एकही बिल न भरलेल्या दोन लाख ग्राहकांकडून महिन्यात १४३ कोटींच्या वील बिलांचा भरणा करण्यात आला आहे.

Speed up recovery of electricity bill in Kolhapur, Sangli | कोल्हापूर, सांगलीत वीजबिल वसुलीला वेग

कोल्हापूर, सांगलीत वीजबिल वसुलीला वेग

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर, सांगलीत वीजबिल वसुलीला वेग १४३ कोटींची वसूली : दोन लाख ग्राहकांनी भरली बिले

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीच्या ग्राहकांचा वीज बिलाचा भरणा करण्याकडे कल वाढला आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वर्गवारीतील गतवर्षी एप्रिलपासून एकही बिल न भरलेल्या दोन लाख ग्राहकांकडून महिन्यात १४३ कोटींच्या वील बिलांचा भरणा करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख १४ हजार ग्राहकांनी ८८ कोटी ४१ लाख, तर सांगली जिल्ह्यातील ८६ हजार ग्राहकांनी ५५ कोटींचे थकीत वीजबिल भरले आहे. दरम्यान, ९ हजार ८५५ ग्राहकांचा वीज पुरवठा थकबाकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला. ग्राहकांसाठी सुलभ हप्त्यात वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणकडून उपलब्ध करून दिलेली आहे.

मागील दहा महिन्यात ग्राहकांना वीज बिलाची थकबाकी असतानाही अखंडित सेवा दिली. एकाही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला नाही. मात्र महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, थकबाकी वसुली आवश्यक आहे. गतवर्षी एक एप्रिलपासून एकही बिल न भरलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश असल्याने ग्राहकांनी कटू कारवाई टाळण्यासाठी चालू व थकीत वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: Speed up recovery of electricity bill in Kolhapur, Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.