बजेटच्या सहा टक्के खर्च शिक्षणावर करा ‘एसएफआय’च्या अधिवेशनात मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 09:43 PM2018-12-12T21:43:12+5:302018-12-12T21:43:29+5:30
शिक्षणाचे सध्या बाजारीकरण व खासगीकरण थांबण्याची आवश्यकता आहे. आजच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासह मूलभूत सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनाने एकूण बजेटच्या सहा टक्के
कोल्हापूर : शिक्षणाचे सध्या बाजारीकरण व खासगीकरण थांबण्याची आवश्यकता आहे. आजच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासह मूलभूत सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनाने एकूण बजेटच्या सहा टक्के खर्च शिक्षणावर करण्याची आवश्यकता असल्याचे मत ‘एम्फुक्टो’चे राज्य उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी व्यक्त केले.
स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) या विद्यार्थी संघटनेचे २० वे जिल्हा अधिवेशन बुधवारी दुपारी दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ येथे झाले. शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमापूजनाने डॉ. सुभाष जाधव यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘एसएफआय’चे राज्याध्यक्ष मोहन जाधव होते.
डॉ. जाधव म्हणाले, सध्या शिक्षणाच्या बाजारीकरणाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शासनही बजेटच्या फक्त तीन टक्केच शिक्षणावर खर्च करते; त्यामुळे आजचे शिक्षण बिकट अवस्थेतील वळणावर येऊन पोहोचले आहे.
अधिवेशनापूर्वी विद्यार्थी रॅलीचा बिंदू चौक येथून प्रारंभ झाला. रॅली शिवाजी रोड, शिवाजी पुतळामार्गे दसरा चौकात पोहोचली. शिक्षणाचे बाजारीकरण बंद करा, शिक्षण आमच्या हक्काचे, इन्कलाब झिंदाबाद, ‘शिक्षा पे जो खर्च होगा, बजेट का दसवा हिस्सा होगा,’ अशा घोषणा दिल्या.
जिल्हा कमिटी अध्यक्षपदी खोत
अधिवेशनात नवीन जिल्हा कमिटीची स्थापना केली. त्याच्या अध्यक्षपदी पंकज खोत, तर सचिवपदी प्रभाकर व्हसकोटी यांची निवड केली.
अधिवेशनातील ठराव
च्शिक्षणाचे बाजारीकरण बंद करा.
च्सर्वांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळावे.
च्कर्नाटकच्या धरतीवर विद्यार्थ्यांना बस प्रवास पास मिळावा.