एड्स जनजागृतीच्या सेल्फी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 11:05 AM2020-12-02T11:05:11+5:302020-12-02T11:12:19+5:30
aids, coronavirus, kolhapurnews एड्स जनजागृती मोहिमेच्या सेल्फी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ८०० पेक्षा जास्त लोकांनी यामध्ये सहभाग घेतला.
कोल्हापूर : जागतिक एकता व सामायिक जबाबदारी ही जागतिक स्तरावरील संकल्पना घेऊन या वर्षीच्या १ डिसेंबर या जागतिक एड्सदिनी मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमांना सुरुवात झाली आहे.
गेल्या २५ वर्षांच्या चालत आलेल्या प्रबोधन रॅली, पथनाट्य, सभा, व्याख्याने, स्पर्धा अशा विविध उपक्रमांची जागा या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन कार्यक्रम, स्पर्धा यांनी घेतलेली आहे. एड्स जनजागृती मोहिमेच्या सेल्फी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ८०० पेक्षा जास्त लोकांनी यामध्ये सहभाग घेतला.
कोल्हापूर एड्समुक्त - स्वप्न नव्हे आमचे ध्येय, जबाबदारी असे फलकावर लिहिलेले सेल्फी काढण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विलास देशमुख, बाह्यसंपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा कार्यक्रमाधिकारी दीपा शिपूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.