गाडेगोंडवाडी येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:03+5:302021-07-10T04:17:03+5:30
सडोली (खालसा) : स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त गाडेगोंडवाडी (ता. करवीर) येथील महारक्तदान शिबिरात ...
सडोली (खालसा) : स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त गाडेगोंडवाडी (ता. करवीर) येथील महारक्तदान शिबिरात कै. पंडित मेटील, निवृत्ती मेटील यांच्या स्मरणार्थ ६३ दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
माजी सरपंच निवृत्ती मेटील व पंडित मेटील यांच्या स्मरणार्थ ‘लोकमत’तर्फे ‘रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत गाडेगोंडवाडी (ता. करवीर) येथील हनुमान मंदिर येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी प्रतिमेचे पूजन रघुनाथ मिठारी, विश्वास वरूटे यांच्या हस्ते झाले. यावेळी भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक विश्वास वरूटे, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सरदार पाटील, पी. एस. पाटील, अमित कांबळे, किशोर पाटील, पांडुरंग कांबळे, संग्राम वरूटे, दत्तात्रय अतिग्रे, विश्वास अतिग्रे, क्रांतीसिंह पवार पाटील, समीर खराडे, शिवाजी भोईटे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, हिंदुराव मेटील, डॉ. शिवाजी बंके, बी. ए. पाटील, रंगराव शेळके, तानाजी मेटील, कृष्णात मुळीक, हिंदुराव देवकर, शामराव मुळीक, दत्तात्रय मुळीक, संभाजी मेटील, दगडू मेटील, साताप्पा मिठारी, बाबासो मिठारी, मयूर देवकर, योगेश मेटील, विवेक मिठारी, रंगराव मिठारी, बाबुराव पाटील, विजय नागावकर, रघुनाथ मिठारी, अभिजित मेटील, प्रकाश मेटील, किरण देवकर, नानासाहेब देवकर, गजानन खाटकी, लोकमत व्यवस्थापक (मनुष्यबळ) संतोष साखरे, दीपक मेटील, जाहिरात प्रतिनिधी मिलिंद कर्वे उपस्थित होते. या शिबिरात राष्ट्रीय हॉकी खेळाडू तेजस्विनी खराडे, हर्षदा लाड, कोमल मुळीक, रोहिणी मुळीक यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त पंडित मेटील, निवृत्ती मेटील यांच्या स्मरणार्थ गाडेगोंडवाडी येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटनावेळी हिंदुराव मेटील, बाबासाहेब देवकर, बी. ए. पाटील, रघुनाथ मिठारी, संभाजी मेटील, साताप्पा मिठारी, नानासो देवकर, डॉ. मधुरा मोरे, लोकमत व्यवस्थापक (मनुष्यबळ) संतोष साखरे, डॉ. शिवाजी बंके, मिलिंद कर्वे, दीपक मेटील उपस्थित होते.