म्हाकवेत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:17 AM2021-07-09T04:17:01+5:302021-07-09T04:17:01+5:30
म्हाकवे : ‘लोकमत नातं रक्ताचं’ या उपक्रमांतर्गत म्हाकवे (ता. कागल) येथे झालेल्या रक्तदान शिबिरात युवकांनी सहभाग घेतला. यावेळी ५० ...
म्हाकवे : ‘लोकमत नातं रक्ताचं’ या उपक्रमांतर्गत म्हाकवे (ता. कागल) येथे झालेल्या रक्तदान शिबिरात युवकांनी सहभाग घेतला. यावेळी ५० जणांनी रक्तदान केले. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी या शिबिराला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी स्वयम् सेवा फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते, ग्रामपंचायत कर्मचारी, संजीवन ब्लड बँकेचे कर्मचारी तसेच येथील युवकांनी परिश्रम घेतले. या शिबिराचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य ए. वाय. पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, सरपंच सुनीता महादेव चौगुले, शाहू साखरचे संचालक पी. डी. चौगुले, पोलीस पाटील अमित पाटील, ए. डी. पाटील, अजित माळी, एस. के. पाटील, निवास पाटील यांच्या हस्ते झाले.
या शिबिरात माधुरी अमित पाटील या एकमेव महिलेने रक्तदान केले. यावेळी उपसरपंच धनंजय पाटील, रमेश पाटील, काँ. शिवाजी मगदूम, काँ. विक्रम खतकर, राजू आरडे, प्रकाश कांबळे, सिद्राम गंगाधरे, संदीप कांबळे, राहुल पाटील, विजय पाटील, आशा संघटनेच्या उज्ज्वला पाटील, ग्रामसेवक एस. वाय. मगदूम, तलाठी सचिन पाटील, हरिदास पाटील, शिवाजी पाटील उपस्थित होते.
०८ म्हाकवे रक्तदान शिबिर
म्हाकवे येथे ‘लोकमत’तर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरातील दात्यांना तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी शिवाजी मगदूम, उज्ज्वला पाटील, आदी उपस्थित होते.
छाया : दत्तात्रय पाटील, म्हाकवे