सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:23 AM2021-04-22T04:23:15+5:302021-04-22T04:23:15+5:30
यावेळी हातीम मुल्ला यांनी स्वागत केले. या प्रसंगी संतोष मोरबाळे यांनी हसन मुश्रीफ यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त ...
यावेळी हातीम मुल्ला यांनी स्वागत केले. या प्रसंगी संतोष मोरबाळे यांनी हसन मुश्रीफ यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. लेबर ऑफिसर संतोष मस्ती यांनी आभार मानले. कारखान्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. १२५ बॉटल रक्तसंचलन झाले. याप्रसंगी कारखान्याचे चिफ केमिस्ट मिलिंद चव्हाण, चीफ इंजिनिअर हुसेन नदाफ, एच.एन.टी मॅनेजर एम. एस. इनामदार, इलेक्ट्रिक मॅनेजर बी. ए. पाटील, परचेस अधिकारी दयानंद आडेकर, सी.डी.ओ उत्तम परीट, तसेच अर्पण ब्लड बँक यांचे डॉक्टर व कारखान्याचे डॉक्टर विजय पाटील उपस्थित होते.
कारखान्याचे सर्व विभागीय अधिकारी खातेप्रमुख व कामगार उपस्थित होते.
२१ सेनापती कापशी
फोटो : ग्रामविकासमंत्री व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) कारखाना कार्यस्थळावर आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.