धामोड शटर डाऊनला प्रतिसाद, कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 07:14 PM2021-04-10T19:14:14+5:302021-04-10T19:17:56+5:30

corona virus Kolhapur : धामोड ( ता. राधानगरी ) येथील ग्रुपग्रामपंचायत व भानोबा व्यापारी संघटना यांनी 'धामोड शटर डाऊन ' या केलेल्या आवाहनाला आज चांगला प्रतिसाद मिळाला . त्यामुळे आजच्या आठवडी बाजाराबरोबर व्यापार पेठेतील सर्वच व्यवहार पूर्णपणे बंद होते .

Spontaneous response to Dhamod shutdown! | धामोड शटर डाऊनला प्रतिसाद, कडकडीत बंद

धामोड (ता .राधानगरी )येथील आठवडा बाजाराच्या पार्श्वभूमी प्रशासनाच्या वतीने तैनात ठेवण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्त .  (छाया : श्रीकांत ऱ्हायकर )

googlenewsNext
ठळक मुद्दे.आठवडी बाजारासह व्यापारपेठ कडकडीत बंददिवसभर पोलीस बंदोबस्त कडक

धामोड :  धामोड ( ता. राधानगरी ) येथील ग्रुपग्रामपंचायत व भानोबा व्यापारी संघटना यांनी 'धामोड शटर डाऊन ' या केलेल्या आवाहनाला आज चांगला प्रतिसाद मिळाला . त्यामुळे आजच्या आठवडी बाजाराबरोबर व्यापार पेठेतील सर्वच व्यवहार पूर्णपणे बंद होते .

या परिसरातील हा मोठा आठवडी बाजार आहे . त्यामुळे परिसरातील जवळपास पंचवीस वाड्या वस्त्यातील लोक बाजारहाट करण्यासाठी येथे येत असतात . पोलीस प्रशासनानेही खबरदारी म्हणून सकाळी आठ वाजल्यापासून कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता .

राज्य सरकारने पुकारलेल्या जमावबंदी व संचारबंदीच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याच्या उद्देशाने धामोड ग्रुपग्रामपंचायत व भानोबा व्यापारी संघटनेने 'धामोड शटर डाऊन ' चे आवाहन केले होते . या आवाहनाला आज धामोड वाशियांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला .

सर्वच व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले . त्यातच आज येथील आठवडी बाजार असल्याने येथे मोठी गर्दी होणार याची शक्यता धरून आजचा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला . पोलिस प्रशासनानेही खबरदारीचा उपाय म्हणून सकाळ पासून कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता .
 

Web Title: Spontaneous response to Dhamod shutdown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.