इचलकरंजीत ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:18 AM2020-12-09T04:18:25+5:302020-12-09T04:18:25+5:30

सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी (फोटो) लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद ...

Spontaneous response to Ichalkaranjit's 'Bandh' | इचलकरंजीत ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजीत ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी

(फोटो)

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वपक्षीय कृती समितीने मंगळवारी सकाळी मुख्य मार्गांवरून पदयात्रा काढून महात्मा गांधी पुतळा चौकात निदर्शने केली. यावेळी केंद्र सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजीही केली.

सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने येथील छत्रपती शाहू महाराज पुतळा येथे जमून मुख्य मार्गांवरून छत्रपती शिवाजी पुतळा, मलाबादे चौक, महात्मा गांधी पुतळा अशी पदयात्रा काढली. गांधी पुतळा येथे जोरदार निदर्शने करून केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर प्रमुख वक्त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान देणारे कायदे रद्द करा, अशी मागणी करीत भाषणे केली. आंदोलनात नगरसेवक राहुल खंजिरे, प्रताप होगाडे, सदा मलाबादे, दत्ता माने, भरमा कांबळे, शिवगोंडा खोत, ए. बी. पाटील, शशांक बावचकर, प्रकाश पाटील, जयकुमार कोले, गोवर्धन दबडे, अण्णासाहेब शहापुरे, विकास चौगुले, आदी सहभागी झाले होते.

‘बंद’मुळे मंगळवारी भरणारा आठवडी बाजार पूर्णत: भरला नव्हता. तसेच वडगाव बाजार कृषी समितीमध्ये सौदे झाले नाहीत. त्यामुळे त्या परिसरात शुकशुकाट जाणवत होता. व्यापारी, उद्योजक, रिक्षाचालक यांनी आंदोलनाला पाठिंबा देत बंद ठेवल्याने नेहमी गजबजलेले सर्व चौक, मुख्य मार्गावर शुकशुकाट जाणवत होता.

.....................

(फोटो ओळी)

०८१२२०२०-आयसीएच-०१

इचलकरंजीत नेहमी गजबजलेल्या जनता बॅँक व शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

०८१२२०२०-आयसीएच-०२

इचलकरंजीत ‘बंद’मुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मलाबादे चौक हा मुख्य मार्ग ओस पडला होता.

०८१२२०२०-आयसीएच-०३

सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मुख्य मार्गांवरून पदयात्रा काढण्यात आली.

०८१२२०२०-आयसीएच-०४

इचलकरंजीत एस. टी. वाहतूक बंद राहिल्याने बसस्थानकावर अडकलेले प्रवासी.

(सर्व छाया- उत्तम पाटील)

Web Title: Spontaneous response to Ichalkaranjit's 'Bandh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.