रक्तदानाच्या हाकेला शिवाजी पेठेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:26 AM2021-07-14T04:26:37+5:302021-07-14T04:26:37+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब ओळखून ‘लोकमत’ व शिवाजी पेठेची प्रातिनिधिक संस्था असलेल्या ...

Spontaneous response of Shivaji Pethe to the call for blood donation | रक्तदानाच्या हाकेला शिवाजी पेठेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रक्तदानाच्या हाकेला शिवाजी पेठेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब ओळखून ‘लोकमत’ व शिवाजी पेठेची प्रातिनिधिक संस्था असलेल्या शिवाजी तरुण मंडळ, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माऊंटेनिअरिंग असोसिएशन, राष्ट्रीय क्षत्रीय जनसंसद यांच्यावतीने शिवाजी मंदिरात सोमवारी झालेल्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चळ‌वळीचे केंद्र बनलेल्या शिवाजी पेठेतून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनीही रक्तदान केले. यात ५९ पिशव्यांचे रक्त संकलन झाले.

डॉ. बलकवडे म्हणाल्या, अनेक रोगांवरील शस्त्रक्रिया, थॅलेसेमिया आदींच्या रुग्णांना रक्ताची गरज होती. ही बाब ओळखून ‘लोकमत’ने रक्तदानाची राज्यात सर्वत्र हाक दिली. त्याला लोकांनीही उदंड प्रतिसाद दिला. शिवाजी पेठेतही पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही यात सहभागी होत आपण कशातच कमी नाही आहोत, हे दाखवून दिले. याचे सर्व श्रेय ‘लोकमत’ला जाते.

शिबिराचे उद्घाटन प्रभारी जिल्हाधिकारी डाॅ. कादंबरी बलकवडे यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, उपाध्यक्ष अजित ऊर्फ पिंटू राऊत, सचिव व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, लालासाहेब गायकवाड, सुहास साळोखे, सुरेश जरग, श्रीकांत भोसले, युवा सेनेचे मनजित माने, चंद्रकांत सूर्यवंशी, कोल्हापूर जिल्हा माऊंटेनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. अमर अडके, उपाध्यक्ष हेमंत साळोखे, पंडित पोवार, संजय कुऱ्हाडे, सुहास साळोखे, शाहीर राजू सावंत, शाहीर दिलीप सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.

इथेच सांडले रक्त, देई तुम्हा आव्हान....

पावनखिंड युद्धात धारातिर्थी पडलेल्या वीरांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षी पन्हाळगड पावनखिंड मोहीम कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माऊंटेनिअरिंग असोसिएशन आयोजित करते; पण यंदा ही मोहीम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असून, धारातिर्थी पडलेल्या वीरांना मानवंदना देण्यासाठी रक्तदान केले.

एव्हरेस्टवीर कस्तुरीही सहभागी

एव्हरेस्टला गवसणी घालणारी कोल्हापूरची पहिली गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिनेही ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘आनंदी जीवन’ च्या सुनंदा इंगवले, तेजस्विनी बराले, शांता जाधव, रुक्मिणीताई पाटील, कांचन बराले यांनीही रक्तदान केले.

फोटो : १२०७२०२१-कोल- कस्तुरी

मर्दानी कलाविशारद कै. आनंदराव पोवार प्राचीन युद्ध कला प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष वस्ताद पंडितराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणी उमेश कोडोलीकर, सुप्रिया विक्रम शिंदे, विक्रम शिंदे, उमेश कोडोलीकर, नंदन कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला.

फोटो : १२०७२०२१-कोल-शिवाजी मंदिर०२

आेळी : कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात ‘लोकमत’तर्फे सोमवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन प्रभारी जिल्हाधिकारी डाॅ. कादंबरी बलकवडे यांच्याहस्ते झाले. यावेळी सुजित चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, महेश जाधव, शिवाजीराव जाधव, अजित नरके, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, लालासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते. (सर्व छाया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: Spontaneous response of Shivaji Pethe to the call for blood donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.