शिवाजी स्टेडियम जलतरण तलावावरून क्रीडाधिकाऱ्यांची खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 06:31 PM2020-11-20T18:31:33+5:302020-11-20T18:32:54+5:30

शिवाजी स्टेडियम जलतरण तलावातील दुरवस्थेवरून शुक्रवारी शहर व जिल्हा कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली. लॉकडाऊनमध्ये आठ महिने कामे करण्यासाठी संधी असताना दुर्लक्ष केल्यावरून त्यांनी जिल्हा क्रीडाधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुल समिती सचिव चंद्रशेखर साखरे यांची खरडपट्टी केली.

Sports officials scramble from Shivaji Stadium swimming pool | शिवाजी स्टेडियम जलतरण तलावावरून क्रीडाधिकाऱ्यांची खरडपट्टी

 कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियम जलतरण तलावाची डागडुजी तातडीने करून तो खुला करण्याच्या मागणीचे निवेदन कृती समितीच्या वतीने जिल्हा क्रीडाधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांना दिले.

Next
ठळक मुद्देशिवाजी स्टेडियम जलतरण तलावावरून क्रीडाधिकाऱ्यांची खरडपट्टी आठ महिन्यांपासून दुर्लक्ष : शहर व जिल्हा कृती समितीकडून प्रश्नांची सरबत्ती

कोल्हापूर : शिवाजी स्टेडियम जलतरण तलावातील दुरवस्थेवरून शुक्रवारी शहर व जिल्हा कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली. लॉकडाऊनमध्ये आठ महिने कामे करण्यासाठी संधी असताना दुर्लक्ष केल्यावरून त्यांनी जिल्हा क्रीडाधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुल समिती सचिव चंद्रशेखर साखरे यांची खरडपट्टी केली.

येथील जलशुद्धीकरण प्रकल्प बंद का आहे; स्वच्छतागृहांची डागडुजी केव्हा केली जाणार आहे; शुद्धीकरण प्रकल्पातील आवश्यक गॅस कधी भरणार आहे; चेंजिंग रूमची दुरुस्ती केव्हा करणार अशा प्रश्नांची सरबत्ती केली. यावर साखरे यांनी १ डिसेंबरपर्यंत येथील सर्व दुरुस्तीचे काम पूर्ण करून स्पर्धेतील खेळाडूंसाठी जलतरण तलाव आणि शिवाजी स्टेडियम खुले करू, अशी ग्वाही दिली.

अशोक पोवार म्हणाले, तळमजल्यावर व्यायामशाळेसाठी हॉल उपलब्ध असताना सात ते आठ लाख रुपये खर्चून वरच्या मजल्यावर नवीन हॉल बांधला आहे. या व्यायामशाळेचा सध्या तरी वापर केला जात नाही. याउलट जलतरण तलावाच्या डागडुजीसाठी हे पैसे वापरले असते तर तलावखेळाडूंसाठी वापरता आला असता. क्रीडादिनावेळी अनेक संस्थांना पाच लाखांच्या क्रीडासाहित्याचे वितरण करण्याचे जाहीर केले. मात्र, अंमलबजावणी केली नाही. यावेळी कृती समितीचे संभाजी जगदाळे, चंद्रकांत सूर्यवंशी, विनोद डुणुंग, यशवंत वाळवेकर, राजाराम सुतार, लहू शिंदे, महादेव जाधव, चंद्रकांत पाटील, विजय सरदार, एस. एन. माळकर, आदी उपस्थित होते.

खासगी सुरू, मग शासकीय तलावाला काय अडचण?

जलतरण तलाव ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे सर्वत्र क्रीडा अकॅडमी मैदाने सुरू झाली आहेत. परंतु कोल्हापुरात शासनाचा एकमेव असणारा आणि कित्येक जलतरण खेळाडूंचा आधारवड असणारा छत्रपती शिवाजी स्टेडियमचा जलतरण तलाव आजअखेर का चालू केला नाही, असा सवाल रमेश मोरे यांनी केला. यावर नियमावली तयार करण्याचे सुरू असल्याचे साखरे यांनी सांगताच त्यांना मोरे यांनी चांगलेच झापले.


Web Title: Sports officials scramble from Shivaji Stadium swimming pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.