खेळातील यशामध्ये ‘क्रीडा मानसशास्त्रा’ची मोलाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 05:56 PM2017-08-06T17:56:54+5:302017-08-06T18:00:21+5:30
कोल्हापूर : क्रीडा वैद्यकीय आणि मानसशास्त्राची नेमकी मदत प्रत्येक खेळाच्या यशामध्ये अत्यंत मोलाची मदत करते. त्याच्या नेमक्या वापरासाठी खेळाडू, पालक आणि प्रशिक्षकांमध्ये व्यापक जागृती होणे आवश्यक आहे, असा सूर कोल्हापूर स्पोर्टस् क्लबतर्फे आयोजित चर्चासत्रात रविवारी व्यक्त झाला.
कोल्हापूर : क्रीडा वैद्यकीय आणि मानसशास्त्राची नेमकी मदत प्रत्येक खेळाच्या यशामध्ये अत्यंत मोलाची मदत करते. त्याच्या नेमक्या वापरासाठी खेळाडू, पालक आणि प्रशिक्षकांमध्ये व्यापक जागृती होणे आवश्यक आहे, असा सूर कोल्हापूर स्पोर्टस् क्लबतर्फे आयोजित चर्चासत्रात रविवारी व्यक्त झाला.
येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये ‘विविध मैदानी खेळांमध्ये खेळाडूंना होणारी दुखापत व त्यावरील उपचार’ याविषयावर हे चर्चासत्र झाले. त्याचे उदघाटन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे विश्वविजय खानविलकर यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या चर्चासत्रात डॉ. प्रदीप पाटील, उदय पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यात डॉ. प्रदीप पाटील म्हणाले, शारिरीक ठेवण, क्रीडा प्रकार हे लक्षात घेवून खेळाडू, प्रशिक्षकांनी व्यायामाचे नियोजन करणे आवश्यक आहे. होणाºया दुखापतीवर वेळीच उपचार गरजेचा आहे.
डॉ. रोहन चव्हाण म्हणाले, खेळाडूंनी आळस, कंटाळा टाळून सरावावर लक्ष केंद्रित करावे. आहाराचा अतिरेक न करता आपला खेळ, त्यासाठी लागणारी ऊर्जा, व्यायाम आणि प्रत्यक्ष खेळ यांचा समन्वय आणि अभ्यास करुनच खेळाडूंनी आहार कोष्टक ठरवावे.
कार्यक्रमात कोल्हापूर स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण यांनी क्लबतर्फे पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच दि. २९ आॅक्टोबरला होणाºया ट्रॉथलॉन या जलतरण- सायकलिंग आणि धावणे यांचा समावेश असलेल्या स्पर्धेची माहिती दिली. यावेळी क्लबचे उपाध्यक्ष विजय कुलकर्णी, सचिव उदय पाटील, संजय पाटील, पदमकुमार पाटील यांच्यासह कोल्हापूर, सांगली व सातारा येथून आलेल्या पालक, प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते.
अतिरेकी अपेक्षाचे दडपण नको
जय-पराजयापेक्षा खेळाचा निव्वळ आनंद खेळाडूंनी घ्यावा. नेहमी होकारात्मकता असावी. पालक, प्रशिक्षकांनी अतिरेकी अपेक्षाचे दडपण खेळाडूंवर ठेवू नये, असे डॉ. उदय पाटील यांनी सांगितले.