अर्थसाक्षरता प्रसार, संशोधनाला मिळणार गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:22 AM2021-02-12T04:22:55+5:302021-02-12T04:22:55+5:30

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आणि आजरा येथील श्री रवळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीमध्ये गुरुवारी सामंजस्य करार झाला. त्याच्या माध्यमातून ...

Spreading literacy, speeding up research | अर्थसाक्षरता प्रसार, संशोधनाला मिळणार गती

अर्थसाक्षरता प्रसार, संशोधनाला मिळणार गती

Next

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आणि आजरा येथील श्री रवळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीमध्ये गुरुवारी सामंजस्य करार झाला. त्याच्या माध्यमातून अर्थसाक्षरता प्रसार, प्रशिक्षण व संशोधन केले जाणार आहे.

विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहातील या कराराच्या कार्यक्रमावेळी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, ‘रवळनाथ’चे संस्थापक एम. एल. चौगुले प्रमुख उपस्थित होते. या करारावर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि एम. एल. चौगुले यांनी स्वाक्षरी केली. विद्यार्थी, संशोधकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमध्ये अर्थसाक्षरतेसंदर्भातील जाणीव-जागृती आवश्यक आहे. त्यादृष्टीने ‘रवळनाथ’च्या सहकार्याने राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदा, कार्यशाळा, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. अर्थ, सहकार व वाणिज्य आदी क्षेत्रांमध्ये अनेक नवनवीन प्रवाह निर्माण होत आहेत. अनेक संधी, आव्हाने सामोरी येत आहेत. त्यादृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याच्यादृष्टीने हा करार उपयुक्त ठरणार असल्याचे डॉ. चौगुले यांनी सांगितले.

यावेळी डॉ. विजय ककडे, विजय आरबोळे, मीना टिंगणे, रेखा पोतदार, जी. के. नाईक, विजयकुमार हरगुडे आदी उपस्थित होते. डॉ. एम. एस. देशमुख यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी आभार मानले.

चौकट

गरजू विद्यार्थ्यांसाठी निधी

या करारावेळी ‘रवळनाथ’च्यावतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी एक लाख रुपयांचा निधी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे डॉ. चौगुले यांनी सुपूर्द केला.

फोटो (११०२२०२१-कोल-रवळनाथ देणगी) :

कोल्हापुरात गुरुवारी श्री रवळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्यावतीने संस्थापक एम. एल. चौगुले यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी एक लाख रुपयांच्या मदत निधीचा धनादेश कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला.

Web Title: Spreading literacy, speeding up research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.