घामाच्या धारांवर पावसाच्या शिडकाव्याची फुंकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 11:00 AM2021-04-09T11:00:11+5:302021-04-09T11:09:12+5:30
Rain Kolhapur-शुक्रवारी दिवसभर घामाच्या धारात भिजल्यानंतर संध्याकाळी आणि शनिवारी सकाळी पावसाच्या हलक्याशा शिडकाव्याने तापलेल्या जीवावर थोडीशी फुंकर मारली. दरम्यान, ढगांची दाटी कायम राहिल्याने हवेतील दमटपणा कायम राहिला.
कोल्हापूर : शुक्रवारी दिवसभर घामाच्या धारात भिजल्यानंतर संध्याकाळी आणि शनिवारी सकाळी पावसाच्या हलक्याशा शिडकाव्याने तापलेल्या जीवावर थोडीशी फुंकर मारली. दरम्यान, ढगांची दाटी कायम राहिल्याने हवेतील दमटपणा कायम राहिला.
हवामान खात्याने वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोल्हापुरात बुधवार व गुरुवार असे सलग दिवस ढगाळ वातावरण आहे. बुधवारी दुपारपर्यंत ढगाळ वातावरण राहिले. शनिवारी सकाळी असेच वातावरण होते. वातावरण ढगाळ असलेतरी उष्मा प्रचंड जाणवत होता. बाहेर फिरणेही मुश्कील झाले होते. ऊन दिसत नसलेतरी झळांमुळे अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. अधेमध्ये येणारी वाऱ्याची झुळूक एवढाच काय तो जीवाला दिलासा देऊन जात होता.
शुक्रवारी संध्याकाळी मात्र थोडा फार पाऊस झाला. शनिवारी सकाळी पावसाच्या हलक्याशा शिडकाव्याने मनाला सुखद गारवा मिळाला. दरम्यान, शुक्रवारी दुपारी अजून तापमानाचा पारा ३९ ते ४० अंशावर स्थिर राहत आहे. संध्याकाळी ४ वाजता देखील पारा ३८ अंशावर होता. रात्रीचे तापमानही २४ पर्यंत वाढले असल्याने रात्रीची झोपही उडाली आहे.