‘गोकुळा’तच श्रीकृष्ण राहू दे, अन्यथा महाभारत-: निवडीनंतर रंगली फटकेबाजी; पडद्यामागील घडामोडी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 01:03 AM2019-01-15T01:03:57+5:302019-01-15T01:04:16+5:30

तहहयात आपणच ‘गोकुळ’चे अध्यक्ष राहावे, असे काहींना वाटते; पण दुसऱ्यालाही अपेक्षा असतात, हा प्रक्रियेचा भाग आहे. इच्छुक अनेकजण होते; पण नेत्यांना रवींद्र आपटेच लायक

Srikrishna should stay in 'Gokul', otherwise the Mahabharata:; Open the scenes | ‘गोकुळा’तच श्रीकृष्ण राहू दे, अन्यथा महाभारत-: निवडीनंतर रंगली फटकेबाजी; पडद्यामागील घडामोडी उघड

‘गोकुळा’तच श्रीकृष्ण राहू दे, अन्यथा महाभारत-: निवडीनंतर रंगली फटकेबाजी; पडद्यामागील घडामोडी उघड

Next
ठळक मुद्दे विश्वास पाटील यांचा सूचक इशारा

कोल्हापूर : तहहयात आपणच ‘गोकुळ’चे अध्यक्ष राहावे, असे काहींना वाटते; पण दुसऱ्यालाही अपेक्षा असतात, हा प्रक्रियेचा भाग आहे. इच्छुक अनेकजण होते; पण नेत्यांना रवींद्र आपटेच लायक वाटले म्हणून त्यांची निवड केल्याचा टोला अरुण डोंगळे यांनी हाणला. मध्यंतरी झालेला गोंधळ विसरून संघाच्या हितासाठी काम केले पाहिजे, श्रीकृष्ण ‘गोकुळ’ मध्ये आहे आणि महाभारतातही. त्याला कोठे ठेवायचे ठरवा, अन्यथा संघात महाभारत होईल, असा सूचक इशारा मावळते अध्यक्ष विश्र्वास पाटील यांनी दिला व मनातील खदखद व्यक्त केली.
‘गोकुळ’ अध्यक्षपदी रवींद्र आपटे यांच्या निवडीनंतर अभिनंदनपर भाषणात संचालकांनी चौफेर फटकेबाजी करत पडद्यामागील घडामोडी उघड केल्या.

अध्यक्ष निवडीदरम्यान झालेल्या घडामोडीत एकमेकांवर शिंतोडे उडविण्याचे प्रकार झाले, आता ते थांबवून संघाच्या हितासाठी एकत्र येऊ या, असे पी. डी. धुंदरे यांनी सांगत विषयाला तोंड फोडले. धैर्यशील देसाई म्हणाले, राजकारणात शर्यत अटळ असते, प्रत्येकाला अध्यक्ष होण्याची इच्छा असते, म्हणजे आमच्यात मतभेद आहेत, असे नाही. आबाजी, बदल हा लोकशाही प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगत डोंगळे म्हणाले, ‘तहहयात आपणच अध्यक्ष राहावे, असे काहींना वाटते, ते चुकीचे आहे.

विश्वास पाटील म्हणाले, कॅशलेस सक्ती आणि पावडर अनुदानाबाबत भाजपचे बाबा देसाई, अनिल यादव काहीच करत नाहीत. रणजित पाटील हेही भाजपमध्ये असले, तरी ते थोडे आत-बाहेर असल्याने यादवसाहेब तुम्हीच थोडी ताकद लावा. यावर श्रीकृष्ण कोण? अशी विचारणा डोंगळे यांनी केली, त्यावर अरुणराव, आपणाला सगळं माहीत असल्याचा पलटवार पाटील यांनी केला. आपटे म्हणाले, विश्वास पाटील यांच्या कामाबद्दल आपण नेत्यांकडे तक्रार केली नाही, दुसºयाला संधी द्या एवढीच आपण विनंती केली; पण यामुळे एरव्ही सतत फोन करणाºया पाटील यांनी महिन्याभरात फोन केला नाही.

पेपरमध्ये नाव आले की क्लेम लागतो
पेपरमध्ये नाव आले की आपला क्लेम राहतो, हे खरे आहे. दीपक पाटील यांनी याबाबत मला विचारल्याचे सांगत आपटे म्हणाले, माझी तब्बेत ठणठणीत आहे, रोज १०० किलोमीटर प्रवास करतो, संपर्कामुळेच तालुक्यातील ६५ टक्के संस्था आपल्यासोबत आहेत.
अध्यक्षपद मिळत असेल तर...
सभागृहात येताच इच्छुक कोठे आहेत, किमान सूचक, अनुमोदक तरी व्हा, अशी कोपरखळी विश्वास पाटील यांनी मारल्याचे डोंगळे यांनी सांगितले. तोच धागा पकडत आबाजी सूचक, अनुमोदक कशाला, अध्यक्षपद मिळत असेल तर सोडावे का..? असा टोला डोंगळेंनी हाणला.


आपटेंचा पायगुण : विश्वास पाटील अध्यक्ष झाले आणि तीन वर्षे दूध पावडरचे दर पडून तोटा झाला. आपटे झाल्यानंतर लगेच पावडरचे दर प्रतिकिलो १९५ रुपयांपर्यंत गेले, आता संघाला फायदा होईल, हा आपटेंचा पायगुण असल्याचा चिमटा अरुण नरके यांनी काढला.

Web Title: Srikrishna should stay in 'Gokul', otherwise the Mahabharata:; Open the scenes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.