Kolhapur: स्टेरिंगमध्ये बिघाड झाल्याने एसटी बसचा अपघात, अनेक प्रवासी जखमी; शिरोळ तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 13:58 IST2023-12-28T13:58:40+5:302023-12-28T13:58:58+5:30
गणेशवाडी : शिरोळ तालुक्यातील शेडशाळ माळभाग येथे स्टेरिंग प्रॉब्लेममुळे झालेल्या अपघातात ४७ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली असून या ...

Kolhapur: स्टेरिंगमध्ये बिघाड झाल्याने एसटी बसचा अपघात, अनेक प्रवासी जखमी; शिरोळ तालुक्यातील घटना
गणेशवाडी : शिरोळ तालुक्यातील शेडशाळ माळभाग येथे स्टेरिंग प्रॉब्लेममुळे झालेल्या अपघातात ४७ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली असून या बघतात अनेक प्रवासीसह विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
कुरुंदवाड आगाराहून सदरची बस गणेशवाडीला जात होती अचानक समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देताना स्टेरिंग मध्ये प्रॉब्लेम आल्याने चालकाचा ताबा सुटला व बस थेट लागत असलेल्या चरीमध्ये गेली दरम्यान, बसमध्ये सुमारे ४७ प्रवासी अडकले व अनेक प्रवासी तसेच विद्यार्थी जखमी झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून तातडीने सर्वांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे घटनास्थळावरून समजते.
घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड आगार विभागाचे अधिकारी तसेच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे.