आदरातिथ्य व्यवस्थापनासाठी घेतली एसटी बस दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:13 AM2021-02-05T07:13:05+5:302021-02-05T07:13:05+5:30

कोल्हापूर : कोरोनामुळे सर्वच उद्योग, व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्यात सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून एस.टी बसेसला म्हटले ...

ST bus adopted for hospitality management | आदरातिथ्य व्यवस्थापनासाठी घेतली एसटी बस दत्तक

आदरातिथ्य व्यवस्थापनासाठी घेतली एसटी बस दत्तक

Next

कोल्हापूर : कोरोनामुळे सर्वच उद्योग, व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्यात सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून एस.टी बसेसला म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोरोनामुळे तिलाही मोठा फटका बसला आहे. त्यातून सावरण्यासाठी ‘बस फॉर अस फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने प्रायोगिक तत्त्वावर आदरातिथ्य व्यवस्थापनासाठी दोन बसेस दत्तक घेतल्या असून, त्या मुंबई-कोल्हापूर या मार्गावर धावत आहेत.

एस.टी.तून प्रवास करताना प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात येणाऱ्या त्रुटी दूर करून त्यांना आदराची सेवा देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे. प्रवास आरामदायी व सुखकर होण्यासाठी यात प्रवासी मित्र मदत करणार आहेत. कोल्हापूर व मुंबई सेंट्रल या दोन्ही बसस्थानकावर प्रवाशांच्या मदतीसाठी विशेष कक्ष उभारण्यात आला आहे, शिवाय येथे संबंधित संस्थेचे सभासद प्रवाशांना या मार्गावरील प्रवासासाठी मार्गदर्शन करणार आहेत.

प्रवाशांसोबत सभासद

संस्थेचे सभासद चालक वाहकांच्या बरोबर प्रवाशांच्या सेवेसाठी या मार्गावर प्रवास करणार आहेत. प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी, सुविधा देण्याचा प्रयत्न या दरम्यान केला जाणार आहे. बसची आतील सजावट आकर्षक करण्याची जबाबदारीही संस्थेने घेतली आहे. ही बस कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक व मुंबई सेंट्रल येथून रोज रात्री दहा वाजता सुटणार आहे. विना वातानुकूलीत शयन-आसनी बससेवा दत्तक घेतली आहे.

कोट

प्रवाशांना आदरयुक्त दर्जात्मक सेवा देण्याचा या प्रयोगातून प्रयत्न केला जाणार आहे. प्रयोगशील मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे. या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, कोल्हापूर विभाग

प्रतिक्रिया

कोरोनानंतरही एसटी महामंडळ तग धरून आहे. त्यांच्याविषयी आणखी आदर वाढावा. याकरिता सहाय म्हणून संस्थेच्यावतीने दोन बसेस दत्तक घेण्यात आल्या आहेत.

- रोहित धेंडे, अध्यक्ष, बस फॉर अस फौंडेशन

फोटो : ३००१२०२१-कोल- एसटी

आेळी : कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात बस फाॅर अस फौंडेशनने प्रायोगिक तत्त्वावर दत्तक घेतलेल्या बसचा प्रारंभ प्रवाशाच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: ST bus adopted for hospitality management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.