एस.टी. कर्मचाऱ्यांना कोविड लस देण्यासाठी प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:12 AM2021-03-30T04:12:53+5:302021-03-30T04:12:53+5:30
कोल्हापूर : सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना सरसकट कोविडची लस देण्याबद्दल प्रयत्नशील राहू, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी दिले. ...
कोल्हापूर : सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना सरसकट कोविडची लस देण्याबद्दल प्रयत्नशील राहू, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी दिले. महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेच्यावतीने यासंदर्भात पालकमंत्री पाटील यांच्याकडे मागणी करण्यात आली होती.
एस.टी.च्या वाहक, चालकांनी लाॅकडाऊन काळात परप्रांतीय लोकांना सीमेपर्यंत सोडण्याचे काम केले आहे. कर्मचारी मंडळी रोज हजारो प्रवाशांशी थेट संपर्कात असतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनाही कोविड लस देणे गरजेचे आहे. याकरिता स्वत: पालकमंत्री म्हणून लक्ष घालावे, असे या निवेदनात म्हटले होते. यावर पालकमंत्री पाटील यांनी तात्काळ एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व शासकीय आरोग्य विभागाचे संचालक यांच्याशी फोनवरून बोलून तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहून तात्काळ कार्यवाही करण्याची विनंती करण्याचेही त्यांनी उपस्थित कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींना आश्वासित केले.
यावेळी संघटनेच्या विभागीय अध्यक्षा अनिता पाटील, सचिव संजीव चिकुर्डेकर, विजय भोसले, बी. आर. साळोखे, एस. वाय. पवार, बी. डी. शिंदे, अय्याज चौगुले यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : २९०३२०२१-कोल-एसटी काँग्रेस
ओळी:
एस.टी. महामंडळाच्या सर्वच कर्मचाऱ्यांना कोविड लस द्यावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य एस.टी. कर्मचारी काँग्रेसच्यावतीने सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनादेण्यात आले.
===Photopath===
290321\29kol_2_29032021_5.jpg
===Caption===
फोटो : २९०३२०२१-कोल-एसटी काँग्रेस आेळी: एस.टी.महामंडळाच्या सर्वच कर्मचाऱ्यांना कोवीड लस द्यावी. अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य एस.टी.कर्मचारी काँग्रेसच्यावतीने सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील यांना निवेदन देण्यात आले.