पंढरपूर यात्रेसाठी थेट गावातून एस.टी.
By admin | Published: July 1, 2017 06:38 PM2017-07-01T18:38:46+5:302017-07-01T18:38:46+5:30
९ जुलैपर्यंत जादा गाड्या; मागणीनुसार गावातून गाडी
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0१ : कोल्हापूर येथील मध्यवर्ती बसस्थानकावर श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेला जाण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी ग्रुप गाडीच्या नियोजनासह १९० जादा गाड्यांचे नियोजनही यावर्षी करण्यात आले आहे. मध्यवर्ती बसस्थानकावर ही सेवा २४ तास उपलब्ध आहे.
कोल्हापूर विभागातर्फे ‘गावातून थेट पंढरपूर व परत आपल्या गावी,’ अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यासह पुरेसे प्रवासी असतील त्यांनी जवळच्या आगाराशी संपर्क साधण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे. यासह गर्दीच्या वेळी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
कोल्हापूर आगारातील जादा गाड्यांचे नियोजन
१) कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक : १६ गाड्या २) संभाजीनगर : १६ गाड्या ३) इचलकरंजी : १५ गाड्या ४) गडहिंग्लज : १८ गाड्या ५) गारगोटी : १८ गाड्या ६) मलकापूर : १५ गाड्या ६) चंदगड : १५ गाड्या ७) कुरुंदवाड : १० गाड्या ८) कागल : ३० गाड्या ९) राधानगरी : १५ गाड्या १०) गारगोटी : १८ गाड्या ११) गगनबावडा : ७ गाड्या १२) आजरा : १५ गाड्या एकूण : १९० गाड्या
गतवर्षी ६६ हजार प्रवासी
श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीनिमित्त गतवर्षी एस. टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे १७३ गाड्यांचे नियोजन केले होते. १७३ गाड्यांमार्फत कोल्हापूर ते पंढरपूर अशा ९३६ फेऱ्या करण्यात आल्या. ६६ हजार ७४ प्रवाशांनी या गाड्या लाभ घेतल्याने कोल्हापूर विभागास ५२ लाख ३ हजार ८३९ रु. इतके उत्पन्न मिळाले.