ST Bus Ticket Price: एसटी प्रवास महाग; पुणे, मुंबईसह कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य मार्गावरचे नवे दर किती.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 15:41 IST2025-01-25T15:41:08+5:302025-01-25T15:41:26+5:30
ST Bus New Ticket Rates: एसटीची शुक्रवारी मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू

ST Bus Ticket Price: एसटी प्रवास महाग; पुणे, मुंबईसह कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य मार्गावरचे नवे दर किती.. जाणून घ्या
कोल्हापूर : एसटी महामंडळाने आपल्या सर्व प्रकारच्या सेवांत शुक्रवारी मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू केली. कोल्हापूर ते पुण्याचा साधी एसटीचा प्रवास ५३ रुपयांनी आणि कोल्हापूर ते मुंबई मार्गावरील प्रवास हा ८९ रुपयांनी महागला. भाडेवाढ झाल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठा भार पडणार आहे. सरासरी १४.९५ टक्के वाढ केली आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. डिझेलचा वाढता दर, चेसीस, टायरच्या वाढत्या किमती, कर्मचारी महागाई भत्त्यावरील खर्च आदी कारणांमुळे भाडेवाढीचा निर्णय घेतला. कोल्हापूर विभागातील बारा आगारात ही भाडेवाढ शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू केली. पुणे प्रादेशिक विभागाकडून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर आगाराला परिपत्रक मिळाले. त्यानंतर ही दरवाढीचे पत्रक विभागीय कार्यालयाने जाहीर केले.
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातून आकारले जाणारे नवे तिकीट दर
मार्ग - जुना दर - नवा दर - वाढ
मुंबई - ५६४ - ६५४ - ८९
पुणे - ३३० - ३८३ - ५३
सातारा - १८५ - २१२ - २७
कराड - १०५ - १२२ - १७
सांगली - ७० - ८१ - ११
पंढरपूर - २६० - ३०३ - ४३
सोलापूर - ३७५ - ४३३ - ५८
इचलकरंजी- ४० - ४६ - ०६
गडहिंग्लज - ९० - १०२ - १२
वाठार - ३० - ३६ - ०६
चंदगड - १६० - १८२ - २२
कागल - २५ - ३१ - ०६
गगनबावडा - ९० - १०२ - १२
राधानगरी - ८०- ९१ - ११
निर्धारित केलेली १४.९५ टक्के भाडेवाढीच्या सूत्रानुसार जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर प्रवासी भाडे निश्चित केले आहे. त्याची अंमलबजावणी शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच सुरू केली आहे. - संतोष बोगरे, विभागीय वाहतूक अधिकारी