Kolhapur: शाहूपुरीत भरदिवसा चाकूहल्ल्याने खळबळ, हल्लेखोरांकडून कारवर दगडफेक; एकजण जखमी

By उद्धव गोडसे | Published: May 2, 2023 04:55 PM2023-05-02T16:55:53+5:302023-05-02T16:56:11+5:30

गर्दी जमताच हल्लेखोर पसार

stabbing in broad daylight stirs In Shahupuri Kolhapur, One injured | Kolhapur: शाहूपुरीत भरदिवसा चाकूहल्ल्याने खळबळ, हल्लेखोरांकडून कारवर दगडफेक; एकजण जखमी

Kolhapur: शाहूपुरीत भरदिवसा चाकूहल्ल्याने खळबळ, हल्लेखोरांकडून कारवर दगडफेक; एकजण जखमी

googlenewsNext

कोल्हापूर : शाहूपुरीतील पहिल्या गल्लीत वहिणी खाद्य भांडारसमोर करवीर बेकरीजवळ पांडुरंग शंकर गायकवाड (वय ५०, रा. केर्ली, ता. करवीर) यांच्यावर चाकूहल्ला झाला. दोन ते तीन हल्लेखोरांनी गायकवाड यांच्या कारवर दगडफेक करून कारचे नुकसान केले. हा प्रकार मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास भरवस्तीत घडला. आर्थिक वादातून हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

घटनास्थळ आणि शाहूपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग गायकवाड हे मंगळवारी दुपारी कामानिमित्त शाहूपुरीत आले होते. करवीर बेकरीसमोर दोन ते तीन हल्लेखोरांनी त्यांची कार अडवली. त्यांनी गायकवाड यांच्याशी वाद घातला. त्यानंतर एकाने गायकवाड यांच्यावर चाकूने हल्ला केला. प्रसंगावधान राखून गायकवाड बाजूला सरल्याने छातीवर होणारा वार उजव्या दंडावर बसला. याचवेळी इतर हल्लेखोरांनी दगडफेक करून कारच्या काचा फोडल्या. गर्दी जमताच हल्लेखोर पळून गेले. जखमी गायकवाड यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले.

चाकूहल्ल्याची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरातील नागरिकांकडून हल्ल्याची माहिती घेतली. त्यानंतर सीपीआरमध्ये जाऊन जखमीचा जबाब नोंदवला. हा हल्ला आर्थिक वादातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हल्लेखोर कदमवाडी येथील असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यामुळे शाहूपुरी परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Web Title: stabbing in broad daylight stirs In Shahupuri Kolhapur, One injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.