मोबाईलवरील स्टेसने केला शुभमचा गेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:32 AM2021-02-25T04:32:19+5:302021-02-25T04:32:19+5:30

दरम्यान, शुभमच्या संपर्कातील पाच तरुणांची नावे संशयित म्हणून पुढे आली आहेत. ते सर्व घटना घडल्यापासून गायब झाले ...

Stace on mobile played Shubham's game | मोबाईलवरील स्टेसने केला शुभमचा गेम

मोबाईलवरील स्टेसने केला शुभमचा गेम

googlenewsNext

दरम्यान, शुभमच्या संपर्कातील पाच तरुणांची नावे संशयित म्हणून पुढे आली आहेत. ते सर्व घटना घडल्यापासून गायब झाले आहेत. या खुनाच्या तपासासाठी पोलिसांची सहा पथके कार्यरत झाली आहेत.

कोरोचीच्या ओसाड माळावर हातकणंगले येथील शुभम कमलाकर या तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा खांब घालून त्याचा निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली होती. या खुनाने आरोपींनी पोलीस यंत्रणेलाच थेट आव्हान दिले असून त्यामुळे सतर्क झालेल्या पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली. शुभमने काल वास्तव चित्रपटातील दगडाने ठेचून खून केल्याचा व्हिडीओ स्टेटसला ठेवला होता. त्याचाही या प्रकरणाशी काही संबंध आहे का? याचीही माहिती पोलीस घेत आहेत.

खुनानंतर शुभमच्या वडिलांनी पोलिसांना संशयितांची नावे सांगितली होती. त्याचवेळी पोलिसांनी तात्काळ कारवाई करणे गरजेचे होते, मात्र पोलिसांची दिरंगाई संशयितांना फरार होण्यास कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. प्रेमप्रकरणातील तरुणीने खुनानंतर तात्काळ आपला फोन फॉरम्याट केला असला तरी, पोलिसांनी सीडीआर रिपोर्टस् ताब्यात घेतले आहेत. कॉल डिटेल्सही तपासले जात असल्याची माहिती जयश्री गायकवाड यांनी दिली.

वास्तव चित्रपटातील स्टेटस

शुभमने आपल्या मोबाईलवर वास्तव चित्रपटातील स्टेटस ठेवला होता. या स्टेटसनेच त्याचा गेम झाल्याची चर्चा होती. शुभम आपला गेम करणार, याअगोदर आपणच त्यांचा गेम करूया, या विचारातून त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचा घात केल्याची चर्चा आहे.

..........

दोन खुनातील साधर्म्य

हातकणंगले येथील शुभम कमलाकर आणि इचलकरंजी येथील खुनामध्ये साधर्म्य असल्याने खुनातील संशयितांचे इचलकरंजी परिसरातील काही गॅंगशी कनेक्शन असल्याचीही चर्चा आहे.

Web Title: Stace on mobile played Shubham's game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.