उच्च शिक्षण संचालकांच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचे कामबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 11:41 AM2020-11-03T11:41:01+5:302020-11-03T11:44:20+5:30
edcationsector, kolhapurnews उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी महिला कर्मचाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिली आहे. त्याचा निषेध आम्ही सोमवारी कामबंद आंदोलनाव्दारे केला असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिली.
कोल्हापूर : उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी महिला कर्मचाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिली आहे. त्याचा निषेध आम्ही सोमवारी कामबंद आंदोलनाव्दारे केला असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिली.
या संचालकांच्या निषेधार्थ राज्य शिक्षण विभाग कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. त्यांनी कार्यालयाच्या बाहेर ठिय्या मारून संचालकांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.
या आंदोलनात पी. एम. नाईक, व्ही. आर. चव्हाण, व्ही. ए. कांबळे, डी. एस. भिऊंगडे, आर. एन. साळोखे, जी. एम. केंद्रे, एस. ए. लाड, पी. एस. गुरव, एस. जे. टिकेकर, आदी सहभागी झाले. संबंधित महिला कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्यायाचे निराकारण व्हावे, या मागणीचे निवेदन आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी विभागीय सहसंचालक अशोक उबाळे यांना दिले.