महापुरातील सेवेकऱ्यांच्या पाठीवर महावितरणकडून बक्षिसाची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 01:18 PM2019-11-22T13:18:25+5:302019-11-22T13:20:23+5:30

कोल्हा पूर : जीवाची पर्वा न करता महा पूर काळात झोकून देऊन वीज जोडणीची कामे करून ग्राहकांना सेवा देण्याचे ...

A stamp on the prize from Mahavidyar on the backs of the servants of the city | महापुरातील सेवेकऱ्यांच्या पाठीवर महावितरणकडून बक्षिसाची थाप

 महापूर काळात बजावलेल्या अतुलनीय सेवेबद्दल कर्मचाºयांना महावितरणकडून रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कोल्हापूर विभागाचे मुख्य अभियंता अनिल भोसले, अधीक्षक अभियंता अंकु र कावळे, कार्यकारी अभियंता राजेंद्र हजारे यांच्या हस्ते या कर्मचाºयांनी बक्षिसाचे चेक स्वीकारले.

Next
ठळक मुद्देमुख्य अभियंता भोसले यांच्या हस्ते गौरव : १२४७ कर्मचाऱ्यांचा समावेश

कोल्हापूर : जीवाची पर्वा न करता महापूर काळात झोकून देऊन वीज जोडणीची कामे करून ग्राहकांना सेवा देण्याचे कर्तव्य बजावणा-या कर्मचा-यांच्या पाठीवर महावितरणने बक्षिसाच्या रूपाने कौतुकाची थाप दिली. महावितरणच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्य अभियंता अनिल भोसले, अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांच्या हस्ते १२४७ कर्मचा-यांचा गौरव करताना ५९२ कर्मचा-यांना प्रशस्तिपत्रासह रोख बक्षीस देऊन त्यांनी दाखविलेल्या धाडसाचे, सेवेचे तोंडभरून कौतुक केले.

महापूर काळात सुरक्षेच्या कारणास्तव वीज पुरवठा थांबविणे, पूर ओसरल्यानंतर तो पुन्हा सुरू करणे ही दोन्ही कामे आव्हानात्मक आणि जीवावर बेतणारी होती; पण तरीदेखील डगमगून न जाता या कर्मचा-यांनी अहोरात्र सेवा बजावली. याची दखल समाजातील इतर घटकांनीही जशी घेतली, तशीच या कर्मचा-यांची संस्था असलेल्या महावितरणनेही घेतली. महावितरणच्या सांघिक कार्यालयाने रोख बक्षीस देण्यासाठी पाच लाख रुपये दिले. यातूनच या कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम झाला.

मोठी जोखीम पत्करून विशेष कार्य करणा-या जिल्ह्यातील ४७५ नियमित कर्मचा-यांना रोख बक्षीस व उत्कृष्ट कर्मचारी, ११७ बाह्यस्रोत कर्मचाºयांनाही रोख बक्षिसाने गौरविण्यात आले. या कर्मचा-यांना भरीव साथ देणा-या ६५५ नियमित कर्मचाºयांनाही उत्कृष्ट कर्मचारी असे प्रशस्तिपत्र देण्यात आले. कार्यक्रमापूर्वी वीजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडलेले कर्मचारी संजय जाखले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्रास्तविक अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी केले. सूत्रसंचालन शकील महात, संभाजी कांबळे यांनी केले. आभार कार्यकारी अभियंता राजेंद्र हजारे यांनी मानले.

महापुराशी दोन हात .....
महापूर काळात झालेले काम हे पराकोटीची निष्ठा आणि कामाप्रती बांधीलकीचा आदर्श दर्शविणारे होते. कर्मचाºयांसह येथे येणाºयांनाही त्याची प्रेरणा मिळावी, कष्टाची जाणीव व्हावी म्हणून महापुराशी दोन हात असा आशय लिहिलेले भित्तिचित्र तयार करण्यात आले आहे. महावितरणच्या ताराबाई पार्क कार्यालयासमोर या भित्तिचित्राचे अनावरण अधिका-यांच्या हस्ते झाले.

 

 

Web Title: A stamp on the prize from Mahavidyar on the backs of the servants of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.