‘स्थायी’ सदस्यांनी आयुक्तांची बैठक उधळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 12:55 AM2017-07-29T00:55:28+5:302017-07-29T00:56:52+5:30

The standing committee members held a meeting of the commissioners | ‘स्थायी’ सदस्यांनी आयुक्तांची बैठक उधळली

‘स्थायी’ सदस्यांनी आयुक्तांची बैठक उधळली

Next
ठळक मुद्देसभेस सर्वच अधिकारी गैरहजर संतप्त सदस्यांचा घेरावो; जाणीवपूर्वक अनुपस्थितीत राहिल्याचा आरोप

कोल्हापूर : महानगरपालिका स्थायी समिती सभा शुक्रवारी असताना त्याकडे साफ दुर्लक्ष करीत आयुक्त अभिजित चौधरी यांनी त्यांच्या सर्व अधिकाºयांबरोबर बैठक घेऊन त्यात अडकवून ठेवले. स्थायी समिती सभेला एकही अधिकारी आलेला नाही हे लक्षात येताच संतप्त झालेल्या सदस्यांनी आयुक्तांची बैठक सुरू असलेल्या खोलीत शिरून चक्क आयुक्तांनाच घेरावो घातला आणि आयुक्तांची बैठक उधळून लावली. जाणीवपूर्वक अशी कृती केल्याच्या संशयाने स्थायी समितीचे सर्वच सदस्य संतप्त झाले आणि त्याचा जाबही आयुक्तांना विचारला.
स्थायी समितीची आठवड्याची सभा पूर्वनियोजित वेळेनुसार शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता बोलाविली होती; परंतु एक वाजला तरी महानगरपलिकेचे अनेक वरिष्ठ अधिकारी सभागृहात उपस्थित नव्हते. नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी सर्व अधिकाºयांना निरोप पाठविला; परंतु अधिकारी आयुक्त चौधरी यांनी घेतलेल्या बैठकीत व्यस्त होते.
कोणीही अधिकारी येत नाहीत हे पाहून सभापती संदीप नेजदार, सत्यजित कदम, आशिष ढवळे, नगसेविका जयश्री चव्हाण, नीलोफर आजरेकर, दीपा मगदूम, प्रतिज्ञा निल्ले-उत्तुरे यांच्यासह सर्वच सदस्यांनी आयुक्तांची बैठक सुुरूअसलेल्या ठिकाणी धाव घेतली आणि अक्षरश: त्यांची बैठकच उधळून लावली. स्थायी समितीची सभा असताना तुम्ही अधिकाºयांसोबत बैठक घेतलीच कशी? सभेला गैरहजर राहणाºया अधिकाºयांवर काय कारवाई करणार? असे प्रश्न विचारून आयुक्तांवर तोंडसुख घेतले. आयुक्तांशी सदस्यांनी वाद घातला. स्थायी सभा आहे, हे माहीत असूनही तुम्ही अधिकाºयांना पाठविले का नाही, अशी विचारणा आयुक्तांकडे केली. आयुक्तांबरोबर वाद घालण्यात महिला सदस्या आघाडीवर होत्या.
आमची बैठक थोडी लांबत गेल्यामुळे स्थायी सभेत यायला अधिकाºयांना विलंब झाला आहे, परंतु आता पाचच मिनिटांत सगळे अधिकारी सभागृहात येतील, असे आश्वासन आयुक्त चौधरी यांनी दिले; परंतु त्याने सदस्यांचे समाधान झाले नाही. गैरहजर राहणाºया अधिकाºयांना शास्ती लावा, असाही आग्रह धरण्यात आला तेव्हा शास्ती लावण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा आयुक्तांनी केला. मात्र, सदस्यांनी आयुक्तांना घेरावो घालून बैठकीचे कामकाज उधळून लावले. त्यामुळे आयुक्तांनीही तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर दीड वाजता अधिकारी स्थायी समिती सभेला गेले.

आयुक्तांनी केली चूक मान्य
स्थायी समिती सदस्यांनी घातलेला घेराव, आयुक्तांशी झालेली वादावादी या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आयुक्त चौधरी यांची भेट घेऊन विचारले असता, त्यांनी आपली चूक प्रांजळपणे मान्य केली. स्थायी समिती सभा होती हे आपल्याला माहीत होते. आम्ही सर्व अधिकारी शहरात राबविल्या जात असलेल्या फेरीवाला धोरणाच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करीत होतो. सभेला येण्याचा निरोप येत होता; पण आमची बैठक लांबत गेली तसेच वरिष्ठ अधिकाºयांना सभेला जाण्यास विलंब झाला. सभेला अन्य अधिकाºयांनी उपस्थित राहिलेच पाहिजे. अनावधानाने झालेली चूक मान्य आहे. पुढील सभेपासून असे होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.


आमची बैठक थोडी लांबत गेल्यामुळे स्थायी सभेत यायला अधिकाºयांना विलंब झाला आहे, पुन्हा असा प्रकार घडणार नाही
-अभिजित चौधरी, आयुक्त

Web Title: The standing committee members held a meeting of the commissioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.