स्टार १०३० : रानभाज्या खा, वाढते रोगप्रतिकारक शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:27 AM2021-08-13T04:27:24+5:302021-08-13T04:27:24+5:30

कोल्हापूर : दरवर्षी पावसाळ्यात पश्चिम घाटातील डोंगर, पठारावर उगवलेल्या रोगप्रतिकारक रानभाज्यांचा शेतकऱ्यांच्या नियमित आहारात समावेश असतो. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य ...

Star 1030: Eat legumes, boosts the immune system | स्टार १०३० : रानभाज्या खा, वाढते रोगप्रतिकारक शक्ती

स्टार १०३० : रानभाज्या खा, वाढते रोगप्रतिकारक शक्ती

Next

कोल्हापूर : दरवर्षी पावसाळ्यात पश्चिम घाटातील डोंगर, पठारावर उगवलेल्या रोगप्रतिकारक रानभाज्यांचा शेतकऱ्यांच्या नियमित आहारात समावेश असतो. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य ठणठणीत असते, तुलनेने शहरातील अनेक नागरिकांना अशा रानभाज्यांची माहिती नाही. मात्र, दहा वर्षांच्या जनजागृतीमुळे नागरिक आता सजग झाले आहेत.

महाराष्ट्रात जवळपास २७५ प्रकारच्या रानभाज्या आढळतात. २०१० पासून निसर्गमित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात १०० हून अधिक प्रकारच्या रानभाज्यांची नोंद झाली असून यातील बहुतांशी औषधी आहेत. त्याची परसबाग फुलवली असून रोपवाटिका तयार केली आहे.

या रानभाज्यांची ओळख आहे का ?

भारंगी : भारंगीचे मूळ ज्वर किंवा कफ असलेल्या रोगासाठी, तसेच दमा, खोकला या विकारावर गुणकारी आहे. ते सुंठ अथवा वेखंडाबरोबर देतात.

काठेकोळसुंदा : ही भाजी वेदनास्थापक व बलदायक म्हणून प्रसिद्ध आहे. याचे मूळ, पाने, बिया, संपूर्ण अंग औषधासाठी वापरले जाते. मुळांचा काढा परमा व बस्तीशोध, तसेच मूळव्याधीसाठी गुणकारी आहे.

टाकळी : ही तिखट, उष्ण, मधुर, कडू, तुरट अग्निदीपक गुणधर्माची रानभाजी पक्षाघात, संधिवात, वायू, कफ, सुजेवर उत्तम औषध आहे. गोवर, तसेच त्वचारोगासाठी ही वनस्पती गुणकारी आहे.

वाघाटी : उष्ण, उत्तेजक असलेली ही रानभाजी पित्तशामक, वातहारक आहे. अंगावर गळवे उठतात, त्यावर याची मुळे उगाळून लेप लावतात. यापासून बनवलेले तेल क्षयरोगावर प्रभावी आहे.

कुडा : पांढरा कुडा औषधी रानभाजी असून बिया भूकवर्धक व आतड्यांना स्तंभक आहेत. कुष्ठरोग, त्वचारोगासाठी गुणकारी असलेली ही भाजी छातीचा भास, दमा या विकारात वापरतात. अन्न जिरते.

या रानभाज्या आता झाल्यात दुर्मीळ ?

सुईची भाजी : ही कदंवर्गीय भाजी शक्तिवर्धक असून लसणीच्या कांद्यासारखा कंद असतो. हे औषध म्हणून वापरले जाते.

गोजिफ : याचे खोड लहान असून जमिनीलगत आढळते. याची पाने औषधी गुणधर्माची आहेत. याच्या पानांची भाजी करतात. पाने खाल्ल्यास रक्तातील साखर कमी होते. ही भाजी मूत्रविकार, जुना त्वचारोग, सोरायसिस आजारावर गुणकारी आहे.

कोट

आपल्याकडे लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बीसह कॅलरीज असलेल्या अनेक कंदवर्गीय, वेलवर्गीय, वृक्षवर्गीय, झुडूपवर्गीय भाज्या सहज उपलब्ध होतात. त्याचा आहारात समावेश केला पाहिजे. सरकारमार्फत रानभाज्यांविषयी जागृती केली जाते, हे अभिनंदनीय आहे; परंतु कोरोना काळात अनेकांनी गूळवेली उपटून नेल्या, हे दु:खदायक आहे. त्याचे जतन केले पाहिजे. रानभाज्यांचे बाजारीकरण थांबवा, त्यांचे नैसर्गिक अस्तित्व नष्ट करू नका.

-डॉ. मधुकर बाचूळकर,

ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ.

--

फोटो : 11062021-Kol-Ranbhajya jevan.

फोटो ओळी : निसर्गमित्र संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या महोत्सवातील रानभाज्यांपासून बनविलेले भोजन.

(संदीप आडनाईक)

120821\12kol_1_12082021_5.jpg

फोटो : 11062021-Kol-Ranbhajya jevan.फोटो ओळी : निसर्गमित्र संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या महोत्सवातील रानभाज्यांपासून बनविलेले भोजन.

Web Title: Star 1030: Eat legumes, boosts the immune system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.