(स्टार १०६५) चोर पोलिसांचा खेळ! चोर सापडतात, पण चोरीचा माल का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:29 AM2021-08-19T04:29:02+5:302021-08-19T04:29:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांच्या तत्परतेने चोरटेही गजाआड होतात, पण त्या चोरट्याकडून चोरीतील ...

(Star 1065) Thief police game! Thieves are found, but why not stolen goods? | (स्टार १०६५) चोर पोलिसांचा खेळ! चोर सापडतात, पण चोरीचा माल का नाही?

(स्टार १०६५) चोर पोलिसांचा खेळ! चोर सापडतात, पण चोरीचा माल का नाही?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांच्या तत्परतेने चोरटेही गजाआड होतात, पण त्या चोरट्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करताना पोलिसांची दमछाक होते. गेल्या सात महिन्यात लहान-मोठ्या अशा सुमारे ११२७ चोऱ्यांच्या घटना घडल्या, पण त्यापैकी फक्त २६२ घटनांचा उघडकीस आल्या आहेत. या चोरीच्या घटनामध्ये बुहतांशी वाहनचोरी, मोबाइल चोरीची संख्या अधिक आहे.

दरोडा, जबरी चोरी, घरफोडी या अशा घटनामध्ये सराईत गुन्हेगार सापडले, तरीही त्यांच्याकडून चोरीतील पूर्ण मुद्देमाल हस्तगत होत नाही. रोकड अगर सोन्याचे दागिने हे चोरटे मौजमस्तीवर उधळतात, त्यामुळे हस्तगत होणाऱ्या मुद्देमालावर तक्रारदाराला समाधानी व्हावे लागते. विशेषत: २०२१ मध्ये कोरोना महामारीमुळे पोलीस यंत्रणा रस्त्यावरच राहिली. त्यामुळे मोठ्या चोरीच्या घटना खूपच कमी घडल्या.

हे पहा आकडे

महिना : चोरी-दरोडे

जानेवारी : ३१५

फेब्रुवारी : १८४

मार्च : १३०

एप्रिल : ११०

मे : ९१

जून : १५४

जुलै : १४३

लूट लाखोंची...

१) महापुरातही पावणेसहा लाखांची घरफोडी

शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पिछाडीस अक्षय पार्कमध्ये चोरट्यांनी महापुरात ४ बंद बंगले फोडून पावणेसहा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. महापूर ओसरताच स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने त्याप्रकरणी तिघांना अटक केली, त्यांच्याकडून अवघा ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत झाला.

२) सव्वाआठ लाखांची घरफोडी

गडमुडशिंगी येथे बनावट चावीचा वापर करून अज्ञाताने बांधकाम व्यावसायिकाच्या घरातील सुमारे सव्वाआठ लाखांची रोकड लंपास केली होती. पोलिसांनी पाच महिन्यांनी घरफोडी उघड करून पाच अटक केले, पण त्यापैकी काहीच रोकड हस्तगत झाली. बहुतांशी रक्कम आरोपींनी चैनीवरच उधळली.

३) शाहूपुरीत व्यापार संकुलात दीड लाखाची चोरी

शाहूपुरीतील यापार संकुलातील वृध्दाचा फ्लॅट बनावट चावीने उघडून सुमारे दीड लाखांची रोकड दिवसाढवळ्या लांबवली होती, चोरट्याला पंधरा दिवसांनी अटक केली, त्यातील १ लाख ३२ हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली.

कोट..

बहुतांशी चोरटे घरफोड्या केल्यानंतर त्यातील रोकड चैनीवर उधळतात, त्यामुळे त्यांना वेळेत पकडणे आवश्यक असते. घरफोडीतील बहुतांशी मुद्देमाल हा पोलीस हस्तगत करण्यासाठी कसोसीने प्रयत्न करतात. - शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा.

Web Title: (Star 1065) Thief police game! Thieves are found, but why not stolen goods?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.