स्टार १०७२ ....अफगाणिस्तानात तणाव वाढला, ड्रायफ्रुट्स १५ टक्क्यांनी महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:27 AM2021-08-20T04:27:44+5:302021-08-20T04:27:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जगातील सर्वात मोठा ड्रायफ्रुटचा निर्यातदार देश म्हणून अफगाणिस्तानकडे पाहिले जाते. मात्र, तेथे तालिबान्यांनी सत्ता ...

Star 1072 .... Tensions rise in Afghanistan, dried fruits go up by 15% | स्टार १०७२ ....अफगाणिस्तानात तणाव वाढला, ड्रायफ्रुट्स १५ टक्क्यांनी महागले

स्टार १०७२ ....अफगाणिस्तानात तणाव वाढला, ड्रायफ्रुट्स १५ टक्क्यांनी महागले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जगातील सर्वात मोठा ड्रायफ्रुटचा निर्यातदार देश म्हणून अफगाणिस्तानकडे पाहिले जाते. मात्र, तेथे तालिबान्यांनी सत्ता काबीज करताच त्याचा फटका जगभरातील ड्रायफ्रुट बाजाराला बसला. अस्थिर वातावरणामुळे भारतात बदाम, अंजीर, मनुका, बेदाणा, जर्दाळू , शहाजीरे आदीचे दर पंधरा टक्क्यांनी वाढले.

अमेरिकेने सैन्य हटवल्यानंतर काही दिवसांतच त्या देशातील परिस्थिती अस्थिर बनली. अफगाणिस्तानातून मामरा बदाम, अंजीर, बेदाणा, काळ्या मनुका, जर्दाळू, शहाजीरे, जीरे, हिंग कच्चा माल आदी भारतात मोठ्या प्रमाणात आयात होतो. बदाम, अंजीर, मनुका, जर्दाळू यांचे आरोग्यविषयक महत्त्व वाढल्याने त्यांच्या खपात वाढ झाली आहे. याशिवाय गणेशोत्सव, दसरा, दिवाळी आदी सणांमध्ये या ड्रायफ्रुटचा वापर सर्वाधिक केला जातो. ड्रायफ्रुटच्या किलोच्या किमतीही तितक्याच तोलामोलाच्या आहेत. त्यामुळे या सर्व पदार्थांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. भारताचा विचार करता अफगाणिस्तानातून मुंबई, दिल्ली, कोलकत्ता आणि हैदराबाद, चेन्नई या मोठ्या शहरांतील मसाले बाजारात ड्रायफ्रुटची कोट्यवधींची उलाढाल होते. ही उलाढाल गेल्या दोन-तीन दिवसांत काहीअंशी थंडावली आहे. भारतानेही तेथील स्फोटक व अस्थिर वातावरणामुळे आपल्या सीमा सील केल्या आहेत. त्याचाही फटका व्यापार थांबण्यात झाला आहे. अफगाणिस्तानातून येणारा मसाला, ड्रायफ्रुट कशा पद्धतीने व कोणत्या दराने यापुढे येईल, याची कल्पना व्यापाऱ्यांना नाही. आगामी काळात गणेशोत्सव असल्यामुळे उपलब्ध मालावरच व्यवसाय करावा लागणार आहे. आयात कमी होणार, या चिंतेने मोठ्या शहरांमधील घाऊक व्यापाऱ्यांनी सर्वच ड्रायफ्रुटचे दर १० टक्क्यांनी वाढवले आहेत.

ड्रायफ्रुटचे वाढलेले प्रति किलोचे व कंसात तणावापूर्वीचे दर असे,

बदाम मामरा - १,००० रु. (८५०-९००)

अंजीर - ८०० ते १४०० रु. (७००- १२००)

बेदाणा - ४०० ते १००० रु. (३००-८५०)

मनुका काळ्या - ३०० ते १००० रु. (२५०-९००)

जर्दाळू - ३०० ते ७०० रु. (२५०- ६५०)

खजूर - २५०-५००० ( ३०० - ५५००)

शहाजीरे - ५०० रु. (४००)

मुबलक स्टाॅक

ड्रायफ्रुट्सची मोठी बाजारपेठ असणाऱ्या मुंबई, दिल्ली येथील व्यापाऱ्यांकडे पुढील काही महिने पुरेल इतका साठा आहे. हा साठा कोल्डस्टोरेज ठेवला आहे. त्यामुळे सध्या तरी तुटवडा नाही. मात्र, दर वाढीव आहेत.

कोट

सद्यस्थितीत अफगाणिस्तानातील वातावरण स्थिर होत नाही, तोपर्यंत तेथून भारतात माल आयात होणे कठीण आहे. तालिबान्यांना सरकार चालवायचे असेल तर व्यापारवृद्धीला महत्त्व द्यावेच लागेल. सद्यस्थितीत मालाची आवक कमी झाल्याने दर १५ टक्क्यांनी वाढले आहेत.

-चिंतन शहा,

ड्रायफ्रुट, मसाले व्यापारी, कोल्हापूर

प्रतिक्रिया

अफगाणिस्तानातील परिस्थिती तणावग्रस्त बनल्यानंतर मुंबई, दिल्लीतील ड्रायफ्रुट्रस बाजारात दरात १५ टक्के वाढ झाली. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेत झाला आहे.

- विजय भंडारी , ड्रायफ्रुट व्यापारी, कोल्हापूर

फोटो : १९०८२०२१-कोल-ड्रायफ्रुट्स

Web Title: Star 1072 .... Tensions rise in Afghanistan, dried fruits go up by 15%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.