स्टार ११०० - सावधान, कमी झोपेमुळे प्रतिकारशक्तीही खालावते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:29 AM2021-08-28T04:29:15+5:302021-08-28T04:29:15+5:30
कोल्हापूर : आरोग्यदायी जगण्यासाठी कमीत कमी सहा तास झोप घेणे आवश्यक असल्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी देतात. कमी झोपेमुळे प्रतिकारशक्तीही ...
कोल्हापूर : आरोग्यदायी जगण्यासाठी कमीत कमी सहा तास झोप घेणे आवश्यक असल्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी देतात. कमी झोपेमुळे प्रतिकारशक्तीही खालावते. परिणामी विविध आजार होतात.
कोरोना आजाराच्या महामारीत प्रतिकारशक्तीला फार महत्त्व आहे. प्रतिकारशक्ती चांगली राहण्याण्यासाठी पुरेशी आणि चांगली झोप घेणे आवश्यक आहे. माणसाच्या विविध वयोगटानुसार झोपेची गरज वेगवेगळी असते, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. वयानुसार झोप घ्यावी लागते. झोपेचे वेळापत्रक बिघडले तर आरोग्यही बिघडण्यास सुरुवात होते. आपण झोप किती घेतो यावर आपले आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती अवलंबून असते. कमी झोपेमुळे प्रतिकारशक्तीही खालावण्याचीही शक्यता असते.
चौकट
१) किमान सहा तास झोप आवश्यक
तीन महिन्यापर्यंतच्या बाळांना १४ ते १७ तास, चार ते १२ महिन्याच्या बाळांना १२ ते १६ तास, एक ते २ वर्षाच्या मुलांना ११ ते १४ तास, तीन ते ५ वर्षे वयोगटातील मुलांना १० ते १३ तास, सहा ते १२ वर्षे वयाच्या मुलांना ९ ते १२ तास तर या पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना कमीत कमी ६ तास झोप घेणे निरोगी राहण्यासाठी गरजेची आहे, असे डॉक्टर सांगतात.
२) अपुऱ्या झोपेचे तोटे (बॉक्स)
अपुऱ्या झोपेमुळे अपचन, पोटाचे विकार, चिडचिडेपणा वाढणे, निरुत्साह, आम्लपित्ताचा त्रास, नैराश्य, उच्च रक्तदाब, जाडेपणा, निर्णय क्षमता कमी होणे, किडनीला विश्रांती मिळत नाही, आदी तोटे होतात. शिवाय लहान मुलांच्यात बौद्धिक विकास खुंटण्याची शक्यता असते.
३) रोगप्रतिकारशक्ती आपल्या शरिराची ढाल (बॉक्स)
रोगप्रतिकारशक्ती आपल्या शरिराची ढाल आहे. यामुळे यावर प्रत्येकाने लक्ष देणे महत्त्वाचे आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास सर्व प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो. निसर्गत:च लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती चांगली असते. तुलनेत मोठ्यांमध्ये कमी, अधिक प्रमाणात असते. कमी प्रतिकारशक्तीचे लोक विविध प्रकारच्या आजारांना लवकर बळी पडतात.
४) संतुलित आहार आणि व्यायामही आवश्यक (बॉक्स)
ज्या हंगामात जी फळे आणि भाजीपाला मिळतो, ते आहारात जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावीत. प्रामुख्याने आहारात ४५ ते ६५ टक्के कार्बोदके, कार्बाेहायड्रेट, २० ते ३५ फॅटस मिळणारे पदार्थ, दहा ते ३५ टक्के प्रथिने आवश्यक आहेत. शिवाय चांगल्या आरोग्यासाठी रोज ३० मिनिटे व्यायाम करण्याची आवश्यकता आहे.
५) एका डॉक्टरचा कोट
उत्तम आयुष्य जगण्याचा मूलमंत्र म्हणजे वेळेत जेवणे आणि वेळेत झोपी जाणे. पुरेशा प्रमाणात झोप नसल्यास अनेक विकार होऊ शकतात. आजारालाही निमंत्रण मिळते. प्रतिकारशक्तीवर परिणाम होऊ शकतो.
डॉ. सुशांत रेवडेकर, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद