स्टार ११०५ प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयांनाच कळा... भाग २
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:51 AM2021-09-02T04:51:16+5:302021-09-02T04:51:16+5:30
इकडे नॉमर्ल, तिकडे सिझर अनेक शासकीय रुणालयातील प्रसूती या एकीकडे नैसर्गिक पध्दतीने होत असताना, खासगी रुग्णालयातील प्रसुतीमध्ये मात्र सिझेरियनचे ...
इकडे नॉमर्ल, तिकडे सिझर
अनेक शासकीय रुणालयातील प्रसूती या एकीकडे नैसर्गिक पध्दतीने होत असताना, खासगी रुग्णालयातील प्रसुतीमध्ये मात्र सिझेरियनचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात येते. याची नेमकी आकडेवारी जरी उपलब्ध नसली, तरी ही वस्तुस्थिती आहे. बाळाभोवती नाळ गुंडाळली आहे, पाण्याचे प्रमाण कमी होत आहे, त्यामुळे सिझेरियन करावे लागेल, असे एकदा डॉक्टरांनी सांगितले की मग परवानगी देण्यावाचून कुटुंबियांच्याही हातामध्ये काही नसते.
कोट
पर्याय नव्हता म्हणून..
माझ्या गरोदरपणातील सर्व आधीच्या तपासण्या महापालिकेच्या पंचगंगा रुग्णालयात सुरू होत्या. मात्र प्रसूतीच्या आधी बाळाचे हृदयाचे ठोके नियमित नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सीपीआरला जायला सांगितले. परंतु तेथील कोरोना रुग्णांमुळे एकूणच परिस्थिती पाहून आम्ही खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला.
सोनाली शेळके
कोट
अस्वच्छता हेच कारण
शासकीय रुग्णालयांमधील अस्वच्छता आणि असलेली गर्दी यामुळे खासगी रुग्णालयात प्रसूतीला जाण्याची वेळ येते, असे माझे निरीक्षण आहे. आता तर शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण असल्यामुळे मी देखील खासगी रुग्णलयातच दाखल होण्याचा निर्णय घेतला.
हेमलता पाटील