स्टार १११६ डेंग्यूने वाढविला ड्रॅगन फ्रुटचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:49 AM2021-09-02T04:49:19+5:302021-09-02T04:49:19+5:30

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या महिना-दीड महिन्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. डेंग्यूमधून लवकर ...

Star 1116 Dengue raises price of Dragon Fruit | स्टार १११६ डेंग्यूने वाढविला ड्रॅगन फ्रुटचा भाव

स्टार १११६ डेंग्यूने वाढविला ड्रॅगन फ्रुटचा भाव

Next

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या महिना-दीड महिन्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. डेंग्यूमधून लवकर बाहेर पडण्यासाठी ‘ड्रॅगन फ्रुट’ व ‘किवी’, ‘पपई’चा वापर केला जातो. मात्र, गेल्या महिन्याभरात ड्रॅगन फ्रुटची मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात २२० रुपये किलोपर्यंत दर पोेहोचले आहेत. ‘ड्रॅगन फ्रुट’चा तुटवडा असल्याने ‘किवी’ची मागणी वाढली आहे.

श्रावण महिन्यात फळांची मागणी वाढत असतेच. उपवास, पूजा आदीसाठी फळांचा वापर होत असल्याने दरही तेजीत असतात. त्यात जुलै, ऑगस्ट महिन्यात डेंग्यू प्रादुर्भाव वाढत असतो. यंदा महापुरामुळे डेंग्यूंच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे डेंग्यूमुळे नागरिक हैराण झाले आहेत. डेंग्यूवर वैद्यकीय उपचार केला जात असला तरी ‘पपई’, ‘किवी’, ‘ड्रॅगन फ्रुट’ ही फळे उपयुक्त आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचार सुरू असतानाही ही फळे दिली जातात. डेंग्यूमुळे रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेटची संख्या झपाट्याने कमी होते. प्रसंगी रुग्ण दगावण्याची शक्यताही असते. प्लेटलेटची संख्या घटू न देता त्या वाढविण्यासाठी ही तिन्ही फळे खूप उपयुक्त आहेत. त्यातही ‘ड्रॅगन फ्रुट’मुळे प्लेटलेटची संख्या झपाट्याने वाढून ती कायम राहते. यासाठी या फळाची मागणी वाढली आहे. सगळीकडे मागणी वाढल्याने कोल्हापूरात ‘ड्रॅगन फ्रुट’ची आवक कमी आहे. एरव्ही प्रत्येक स्टॉलवर सहजपणे उपलब्ध असलेले हे फळ आता कोठेतरी पाहावयास मिळत आहे. आवक कमी आणि मागणी वाढल्याने दरातही दुपटीने वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एरव्ही १०० ते ११० रुपये किलो मिळणारे ‘ड्रॅगन फ्रुट’ आता २२० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

सफरचंदचे दर निम्यावर

जुलैमध्ये सफरचंदचे दर २०० ते २४० रुपये किलोपर्यंत राहिला. मात्र, आता आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. सध्या ७० ते १०० रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत.

फळांचे दर रुपयात (प्रतिकिलो)

ड्रॅगन फ्रुट - २२०

डाळिंब -१५०

सफरचंद -८० ते १००

संत्रा -१६०

मोसंबी -६०

चिकू - ४०

पपई - २५ ते ३० (प्रतिनग)

थायलंड पेरू - १००

साधे पेरू - ४०

कोट-

ड्रॅगन फ्रुटची मागणी वाढली आहे, मात्र त्या पटीत माल उपलब्ध हाेत नाही. सगळीकडेच मागणी असल्याने पुरवठा कमी होत आहे, परिणाम दरात मोठी वाढ झाली आहे. तुलनेत इतर फळांचे दर स्थिर आहेत.

- आप्पासाहेब पुजारी, फळ विक्रेते, कोल्हापूर

फाेटो-

१) कोल्हापुरात ड्रॅगन फ्रुटची आवक कमी झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. (फोटो-३१०८२०२१-कोल-ड्रॅगन फ्रुट)

२) ड्रॅगन फ्रुटला डेंग्यूसाठी पर्याय म्हणून पपई खाल्ली जाते, पपईची आवक मात्र चांगली आहे. (फोटो-३१०८२०२१-कोल-फ्रुट) (छाया- नसीर अत्तार)

Web Title: Star 1116 Dengue raises price of Dragon Fruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.