(स्टार ११३६) पोलिसांची नजर चुकली, ट्रीपलसीट सुसाट धावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:27 AM2021-09-05T04:27:39+5:302021-09-05T04:27:39+5:30

कोल्हापूर : ट्रीपलसीट दुचाकी चालवणे कायद्याने गुन्हा असला तरीही अनेक दुचाकीचालक हा गुन्हा जाणून-बुजून करतातच. विशेषत; तरुणाई दुचाकीवरुन ट्रीपलसीट ...

(Star 1136) Missed the police, triple seat ran smoothly | (स्टार ११३६) पोलिसांची नजर चुकली, ट्रीपलसीट सुसाट धावली

(स्टार ११३६) पोलिसांची नजर चुकली, ट्रीपलसीट सुसाट धावली

Next

कोल्हापूर : ट्रीपलसीट दुचाकी चालवणे कायद्याने गुन्हा असला तरीही अनेक दुचाकीचालक हा गुन्हा जाणून-बुजून करतातच. विशेषत; तरुणाई दुचाकीवरुन ट्रीपलसीट सुसाट वेगाने धावताना नजरेस पडतेच. अशा ट्रीपलसीट वाहनचालकांना आवरणार कोण? असाच प्रश्न समाजासमोर आहे. हे ट्रीपलसीट वाहनचालक स्वत:बरोबरच इतरांचाही जीव धोक्यात घालतात. अशा वाहनधारकांना नाममात्र २०० रुपये दंड असला तरीही त्यांच्यावर कठोर शासन झाले पाहिजे.

शहरात चौकात-चौकात नेमणुकीस असणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून अनेक दुचाकीवरुन ट्रीपलसीट प्रवास करणारे नजरेस पडतातच. वेगाने धावणाऱ्या या ट्रीपलसीट चालकाचा पाठलाग करणेही त्यांच्या अगर इतर वाहनधारकांच्या जीवावर बेतण्याचा धोका असतो. शहरात तर अशा ट्रीपलसीट वाहनधारकांचा मुजोरपणा वाढला आहे. त्यातून अनेक अपघाताच्या घटना घडल्या. चौकात वाहतूक शाखेचा पोलीस दिसल्यास ट्रीपलसीटवरील एकजण उतरुन पुढे पायी येऊन पुन्हा त्याच दुचाकीवर बसून सुसाट जातात. अतिवेगाने वाहन चालवून अनेक ठिकाणी ते अपघाताला आमंत्रण देतात. गेल्या आठ महिन्यात शहर व परिसरात कोल्हापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने २२६७ ट्रीपलसीट दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई करत सुमारे सव्वापाच लाख रुपये दंड वसूल केला.

किती जणावर झाली कारवाई :

जानेवारी : ४८०

फेब्रुवारी : ४२१

मार्च : २१६

एप्रिल : ००

मे : ००

जून : ३०१

जुलै : ४११

ऑगस्ट : ४३८

दुचाकी वाहनचालकांनो, हे नियम पाळा

१) विनाहेल्मेट दुचाकी चालवू नये.

२) ट्रीपलसीट वाहन चालवू नये.

३) विना लायसन्स वाहन चालवू नये

४) डाव्या बाजूने वाहने चालवावीत

५) अवजड वाहनांना ओव्हरटेक करु नये.

६) वेगमर्यादा पाळावी.

तर ‘हायस्पीड’ला हजाराच्या दंडाची पावती

१) ट्रीपलसीट - २०० रुपये दंड

२) विनाहेल्मेट - ५०० रुपये दंड

३) विनालायसन्स : २०० ते ५०० रुपये दंड

४) वन-वे तोडणे : २०० रु. दंड

५) दुचाकीचे हायस्पीड : १००० रु. दंड

६) दुचाकीवरुन मोबाईल टॉकिंग : २००

७) सिग्नल तोडणे : २०० (लायसन्स जप्त- तीन महिने लायसन्स निलंबन)

८) दारु पिऊन वाहन चालवणे : ५०० ते २००० रु. दंड (न्यायालयामार्फत)

फोटो नं.०४०९२०२१-कोल-ट्रीपल सीट०१,०२

ओळ : कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत गर्दीच्या ठिकाणीही कायद्याची तमा न बाळगता ट्रीपलसीट वाहनधारक सुसाट धावतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)

040921\04kol_2_04092021_5.jpg~040921\04kol_3_04092021_5.jpg

ओळ : कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत गर्दीच्या ठिकाणीही कायद्याची तमा न बाळगता ट्रीपल सीट वाहनधारक सुसाट धावतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)~ओळ : कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत गर्दीच्या ठिकाणीही कायद्याची तमा न बाळगता ट्रीपल सीट वाहनधारक सुसाट धावतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: (Star 1136) Missed the police, triple seat ran smoothly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.